AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : कॅप्टन शुबमनकडे मोठी संधी, थेट सचिन-द्रविडच्या क्लबमध्ये मिळणार स्थान, फक्त 272 धावांची गरज

Shubman Gill Test Cricket : शुबमन गिल याने 2025 हे वर्ष फलंदाज आणि कसोटी कर्णधार म्हणून गाजवलं. आता शुबमनकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी 9 वर्षांनतर ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे.

IND vs SA : कॅप्टन शुबमनकडे मोठी संधी, थेट सचिन-द्रविडच्या क्लबमध्ये मिळणार स्थान, फक्त 272 धावांची गरज
Team India Shubman Gill Test CricketImage Credit source: PTI
| Updated on: Nov 13, 2025 | 5:46 PM
Share

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी कंबर कसली आहे. भारतीय संघाने कसोटी मालिकेआधी नेट्समध्ये भरपूर घाम गाळला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेला शुक्रवार 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. सामन्याची सर्व तयारी झाली आहे. भारताची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील तिसरी मालिका आहे. भारताने 2 पैकी 1 मालिकेत विजय मिळवला आहे. तर 1 मालिका बरोबरीत सोडवली आहे. आता चाहत्यांची भारताच्या तिसऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्याची प्रतिक्षा काही तासांत संपणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार शुबमन गिल याला दिग्गज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्या क्लबमध्ये एन्ट्री घेण्याची संधी आहे.

भारताचा ही मालिका 2-0 ने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये धडक देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला शुबमनच्या निशाण्यावर सचिन, द्रविड आणि विराट या माजी दिग्गजांच्या पंगतीत धडक देण्याचा प्रयत्न असणार आहे. शुबमनला त्यासाठी केवळ 272 धावांची गरज आहे.

शुबमनची 2025 जबसदस्त कामगिरी

शुबमनसाठी 2025 हे वर्ष आतांपर्यंत अविस्मरणीय राहिलंय. शुबमनला याच वर्षात कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. शुबमनने फलंदाज आणि कर्णधार या दोन्ही भूमिका आतापर्यंत सार्थपणे पार पाडल्या आहेत. आता शुबमनला 2025 वर्षात 2 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्यासाठी शुबमनला 272 धावांची गरज आहे. सर्वात महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणून गिल 2025 वर्षात एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. यावरुन शुबमनने काय पद्धतीने बॅटिंग केलीय याचा अंदाज येतो.

आता शुबमनकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनिमित्ताने खास कामगिरी करण्याची संधी आहे. शुबमनकडे एकदाही झिरोवर आऊट न होता एका वर्षात 2 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज होण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झिरोवर आऊट होऊन चालणार नाही. तसेच शुबमनला 272 धावा कराव्या लागतील. शुबमन गिल याने अशी कामगिरी केल्यास तो पहिला सक्रिय आणि एकूण चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

गिल चौथा भारतीय ठरणार?

आतापर्यंत टीम इंडियाकडून विराट कोहली सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या तिघांनी हा कारनामा केला आहे. विराटने 2016 वर्षात एकदाही झिरोवर आऊट न होता एकूण 2 हजार 595 धावा केल्या होत्या. विराट यासह टीम भारताचा एका वर्षात एकदाही झिरोवर आऊट न होता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला होता. विराटचा हा विक्रम 9 वर्षांनंतरही कायम आहे.

तसेच सचिनने 1998 साली एकदाही शून्यावर बाद न होता 2 हजार 541 धावा केल्या होत्या. तर द्रविडने सचिनच्या 4 वर्षांनंतर अशीच कामगिरी केली होती. द्रविडने तेव्हा 2 हजार 270 रन्स केल्या होत्या.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.