AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरने मोहम्मद सिराज असं काही सांगितलं की आनंद गगनात मावेना

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी केली. त्याने या मालिकेत 23 विकेट घेतल्या. पाचव्या कसोटीत 9 विकेट घेत सामनावीराचा मानकरी ठरला. असं असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सिराजचं कौतुक केलं. त्यामुळे सिराज खूश झाला आहे.

सचिन तेंडुलकरने मोहम्मद सिराज असं काही सांगितलं की आनंद गगनात मावेना
सचिन तेंडुलकरने मोहम्मद सिराज असं काही सांगितलं की आनंद गगनात मावेनाImage Credit source: PTI
| Updated on: Aug 10, 2025 | 7:29 PM
Share

इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका संपून आठवडा उलटला आहे. मात्र या कसोटी मालिकेची चर्चा काही संपलेली नाही. कारण या मालिकेपूर्वी भारत 4-0 ने पराभूत होईल वगैरे अशी भाकीतं वर्तवली जात होती. मात्र भारताने ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. लॉर्ड कसोटीत 22 धावांनी पराभव झाला नसता तर कदाचित ही मालिका खिशात घातली असती. या मालिकेत मोहम्मद सिराज हा हिरो ठरला. कारण त्याने जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. या मालिकेत त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. पाचव्या कसोटी सामन्यात त्याच्या गोलंदाजीला धार चढली होती. मोहम्मद सिराजने कसोटी कारकि‍र्दीत पहिल्यांदाच सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही त्याचं कौतुक केलं. सचिन तेंडुलकरने कौतुक केल्यानंतर मोहम्मद सिराजही खूश झाला.

सचिन तेंडुलकर नेमकं काय म्हणाला?

100MB या एक्स खात्यावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात सचिन तेंडुलकर सिराजचं कौतुक करत आहे. त्याने सांगितलं की, ‘त्याने जबरदस्त कामगिरी केली. मला त्याचा हेतू आवडला. त्याच्यात ऊर्जा होती. ती पाहून मी खूश झालो. जर तुम्ही स्कोअर कार्डकडे पाहीलं नाही आणि सिराजची बॉडी लँग्वेज पाहिली तर तुम्हाला वाटत नाही की त्याने 5 विकेट घेतल्या किंवा एकही विकेट घेतली नाही.’ या व्हिडिओला उत्तर देताना सिराजने लिहिले, “धन्यवाद सर.”

पाचव्या कसोटी सामन्यात सिराजमुळे विजय शक्य

पाचव्या कसोटी सामन्यात एक वेळ अशी होती की इंग्लंड सहज जिंकेल. अशा स्थितीतून भारताने हा सामना जिंकला आहे. सिराजने दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले. तेही आशा स्थितीत जेव्हा भारताला खरंच गरज होती. खेळाच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे चार विकेट्स शिल्लक होत्या. त्यामुळे हा सामना पूर्णपणे इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला होता. पण सिराजने यापैकी तीन विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.