AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: उर्वरीत आयपीएलमध्ये ज्युनियर तेंडुलकरचा जलवा दिसणार, Mumbai Indians ने शेअर केला अर्जुनच्या गोलंदाजीचा अफलातून VIDEO

उर्वरीत आयपीएल (IPL 2021) सुरु होण्याकरता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पहिला सामना 19 सप्टेंंबर रोजी पार पडणार असून हा सामना मातब्बर संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग यांच्यात रंगणार आहे.

IPL 2021: उर्वरीत आयपीएलमध्ये ज्युनियर तेंडुलकरचा जलवा दिसणार, Mumbai Indians ने शेअर केला अर्जुनच्या गोलंदाजीचा अफलातून VIDEO
अर्जुंन तेंडुलकर
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 2:17 PM
Share

दुबई : कोरोनाच्या संकटामुळे उर्वरीत आयपीएल (IPL 2021) ही युएई (UAE) होणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ हळू हळू युएईला पोहोचत आहेत. युएईत पोहोचलेले खेळाडू सराव करण्यात व्यस्त असून नेटमध्ये आपला जलवा दाखवत आहेत. संघही सोशल मीडियावर खेळाडूंच्या सरावाचे व्हिडीओ शेअर करुन त्यांच मनोबल वाढवत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने देखील एका युवा गोलंदाजाच्या भेदक सरावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याचा आहे. हा व्हिडीओ पाहून अर्जुनला उर्वरीत आयपीएलमध्ये संधी मिळेल या चर्चेला उधान आले आहे.

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अर्जुन दक्षिण आफ्रीका संघाचा 6 फुट 8 इंच उंच मार्को जेन्सनसोबत सराव करत आहे. यावेळी यॉर्कर आणि अन्य उत्तम बॉल टाकत अर्जुन स्टम्प उडवत आहे. अगदी दिग्गज गोलंदाज मलिंगा, बुमराह यांच्याप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या व्हिडीओमध्ये अर्जुन करताना दिसत आहे.

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्समध्ये दाखल

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या लीलावात अर्जुन तेंडुलकर हा लिलावातील आकर्षणाचा मुद्दा ठरला. अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. दरम्यान यानंतर अर्जुनवर सोशल मीडियावरुन घराणेशाहीच्या मुद्यावरुन जोरदार टीका करण्यात आली होती. अद्याप अर्जुनला मैदानात खेळण्याची संधी मिळाली नसून आता उर्वरीत सामन्यात तो खेळेल अशी चर्चा आहे.

मुंबई इंडियन्सने लुटली वॉलीबॉलची मजा

सरावासोबतच मुंबई इंडियन्सचे खेळाडू मजा मस्तीही करत आहेत. अबुदाबीमध्ये असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने पाण्यामध्ये उतरत वॉलीबॉल खेळाचा आनंद लुटला. मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर हा वॉलीबॉल खेळतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी पोस्ट केला होता.  यामध्ये इशान किशन, पीयूष चावला, आदित्य तारेसह धवन कुलकर्णी आणि इतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिसून येत आहेत. आयपीएल 2021 च्या उर्वरीत 31 सामन्यांमध्ये पहिलाच सामना मुंबई विरुद्ध चेन्नई असल्याने क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे ही वाचा

IPL 2021 : आयपीएलच्या उर्वरीत पर्वामध्ये 9 खेळाडूंची अदला-बदली, वाचा सगळे बदल एका क्लिकवर

IPL 2021 : चेन्नईचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना म्हणतो, मी JOHN CENA, पाहा रैनाचा WWE स्टंट

IPL 2021 : आरसीबी संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे धाकड खेळाडू संघाबाहेर, बदली खेळाडू म्हणून ‘या’ युवा खेळाडूची निवड

(Sachin tendulkar son arjun tendulkar may debut for mumbai indians in IPL 2021 remaining matches MI shares his video)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.