IPL 2021 : चेन्नईचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना म्हणतो, मी JOHN CENA, पाहा रैनाचा WWE स्टंट

आयपीएलचे उर्वरीत सामने सुरु होण्यासाठी अगदी महिन्यांभराहून कमी वेळ राहिला आहे. त्यामुळे सर्व खेळाडू जोमात सरावाला लागले आहेत. चेन्नईचा संघही युएईत पोहोचला असून सरावासोबत मजा-मस्तीही करत आहे.

IPL 2021 : चेन्नईचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना म्हणतो, मी JOHN CENA, पाहा रैनाचा WWE स्टंट
सुरेश रैना

दुबई : आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) काही खास प्रदर्शन केलं नव्हतं. पण यंदा (IPL 2021) आतापर्यंत झालेल्या सीजनमध्ये चेन्नईचा संघ पुन्हा आपल्या रंगात दिसून आला. याला कारण म्हणा किंवा योगायोग पण संघातील लाडका आणि प्रमुख खेळाडू सुरैश रैना (Suresh Raina) संघात परत आला आहे. संघात परत आलेला रैना यंदा आपल्या संघाला जिंकवण्यासाठी कसून सराव करत आहे. पण या सरावासोबतच रैना थोडी मजा-मस्ती देखील करत आहे.

असाच एक मजेशीर व्हिडीओ चेन्नई सुपरकिंगने त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश रैना हा सहखेळाडू केएम आसिफ (KM Asif) याच्यासोबत पूलजवळ मस्ती करत आहे. यामध्ये WWE मधील रेसलर्सप्रमाणे असिफला घेऊन पूलमध्ये उडी टाकत आहे. सोबत मागे ‘Im John Cena’ हे म्युजिक लागले आहे. त्यामुळे जणू रैना स्वत:ला प्रसिद्ध WWE स्टार जॉन सिना समजत असल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

रैना आणि आयपीएल

सुरेश रैना आयपीएलमधील एक दमदार खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला तर ‘मिस्टर आयपीएल’ असा खिताबही चाहत्यांनी दिला आहे. यंदाच्या आयपीएलमधील सात सामन्यात रैनाने 123 धावा केल्या असून यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. तर आयपीएल कारकिर्दीचा विचार करता त्याने 200 सामने खेळले असून त्यात 5 हजार 491 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि 39 अर्धशतकाचा समावेश आहे.

इतर बातम्या

Happy Birthday : सलामीच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजाना पछाडलं, ‘हा’ ठरला भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(CSK Cricketer suresh raina considers himself john cena see his fun video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI