PHOTO : रैनाचा पास, तर धोनीची किक, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ फुटबॉलमध्ये रमला

कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेली उर्वरीत आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वात आधी चेन्नईचा संघ युएईत पोहोचला आहे.

1/5
बहुप्रतिक्षित इंडियन प्रिमियर लीगच्या (IPL 2021) उर्वरीत सामन्यांना 19 सप्टेंबरपासून युएईत (UAE) सुरुवात होणार आहे. यासाठी सर्वात आधी म्हणजे 13 ऑगस्टलाच चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) संघ युएईला पोहोचला आहे. विलगीकरणाचा कालावधी संपवून सर्व खेळाडू मैदानात सरावासाठी उतरले आहेत.  दरम्यान क्रिकेटच्य़ा सरावातून थोडा विरंगुळा म्हणून धोनीच्या टोळीने फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. (सौजन्य - CSK twitter)

2/5
चेन्नई सुपरकिंग संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन खेळाडूंचे फुटबॉल खेळतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये एमएस धोनी (MS Dhoni), सुरेश रैनासह (Suresh Raina), रॉबिन उथप्पा (Robin uthappa), करन शर्मा हे खेळाडू दिसत आहेत. धोनीचा जिगरी यार असणारा सुरेश रैना देखील सामन्यांपूर्वी स्वत:ला फिट करण्यासाठी जोमात सराव करत आहे. (सौजन्य - CSK twitter)

3/5
काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये बॉलिवुड स्टार्ससोबत चॅरीटी मॅचमध्ये फुटबॉल खेळणारा धोनी युएईतही सरावादरम्यान फुटबॉलचा आनंद लुटत आहे. यातून पुन्हा एकदा धोनीचं फुटबॉलप्रेम दिसून आलं आहे.(सौजन्य - CSK twitter)

4/5
भारतीय संघातील एक खालच्या फळीतील उत्तम खेळाडू असणारा रॉबीन उथप्पा भारतीय संघात अधिक सामने खेळू शकला नाही. मात्र सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई संघात असून फिट दिसत आहे. फुटबॉल खेळताना त्याचा फिटनेस दिसून येत आहे. (सौजन्य - CSK twitter)

5/5
चेन्नई संघाचा युवा खेळाडू करन शर्माही फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटत आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये खास कामगिरी करु न शकलेल्या करनवर यंदा अनेकांच्या नजरा असतील. (सौजन्य - CSK twitter)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI