IND vs SA | ‘मला सर्वात जास्त आवडलं ते…’; KL राहुलच्या क्लास शतकी खेळीने सचिन तेंडुलकर इम्प्रेस

Sachin Tendulkar on KL Rahul : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यामध्ये केएल राहुल याने शतकी खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला. या शतकी खेळीवरून सचिनचे राहुलचं कौतुक केलं आहे.

IND vs SA | मला सर्वात जास्त आवडलं ते...; KL राहुलच्या क्लास शतकी खेळीने सचिन तेंडुलकर इम्प्रेस
Sachin Tendulkar on KL After century against south africa
| Updated on: Dec 27, 2023 | 9:29 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. हा सामना सेंच्युरियन या मैदानावर सुरू असून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आफ्रिका संघाने झकास सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी इंडियाच्या फलंदाजांचा आफ्रिकन गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. मात्र के.एल. राहुल याने केलेल्या 101 धावांच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाला सन्मानजनक स्कोर करता आला. टीम इंडियासाठी तारणहार ठरलेल्या के. एल. राहुलचं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने कौतुक केलं आहे.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

के. एल. राहुल याने सर्वात जास्त प्रभावित केलं ते म्हणजे त्याने जे शॉट खेळले त्यातून त्याची स्पष्ट मानसिकता दिसून आली. राहुलचा फुटवर्क उत्कृष्ट होता. कोणताही फलंदाज अशा मानसिकतेने मैदानात उतरतो तेव्हाच अशी चमकदार कामगिरी करू शकतो. टीम इंडिया आधी ज्या परिस्थिती होती त्यावरून 245 धावा सन्मानजनक स्कोर असल्याचं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. त्यासोबतच सचिनने आफ्रिकेच्या गोलंदाजांचं कौतुक केलं.

 

आफ्रिकेचे गोलंदाज नांद्रे बर्गर आणि गेराल्ड कोएत्झी दोघेही चांगलं योगदान देत आहेत. मला वाटतं की आफ्रिकन संघसुद्धा सामन्याची परिस्थिती पाहता गोलंदाजांच्या कामगिरीवर खूश असेल, असं सचिनने म्हटलं आहे. सचिनने याबाबत ट्विट केलं आहे. के. एल. राहुल याने 137 बॉलमध्ये 101 धावा केल्या यामध्ये त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या. यामध्ये के.एल. राहुल 101 धावा, विराट कोहली 38 धावा आणि श्रेयस अय्यरने 31 धावा केल्या. आफ्रिकेकडून कगिसो रबाडा याने 5 तर  नांद्रे बर्गर याने 3 विकेट घेतल्या.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर