AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA | ..अन् गेली ना भावा विकेट, स्टम्पजवळ कोहलीने फुकला मंत्र, टीम इंडियाला मिळालं यश

Virat kohli changes swaping bails : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली याने कमाल करून दाखवली. विकेट पडत नव्हती तेव्हा बेल्सजवळ जात केलं असं की की पूढच्या ओव्हरमध्ये आफ्रिकेची विकेट पडली.

IND vs SA | ..अन् गेली ना भावा विकेट, स्टम्पजवळ कोहलीने फुकला मंत्र, टीम इंडियाला मिळालं यश
Virat kohli change bails
| Updated on: Dec 27, 2023 | 8:23 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना आहे. सेंच्यरियन येथे सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाची सुरूवात खराब झाली होती. दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी झाली होती. जसप्रीत बुमराह याने ही जोडी फोडली. ही विकेट जाण्याआधी कोहलीने जे काही त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

विराट कोहलीने काय केलं?

आफ्रिकेचा संघ बॅटींगसाठी उतरला आणि अवघ्या 11 धावांवर सिराजने पहिली विकेट घेतली. टीम इंडियाला पहिलं यश लवकर मिळालं. मात्र त्यानंतर डीन एल्गर आणि टोनी डी जोर्जी यांनी टिकून राहत आफ्रिकन गोलंदाजांचा घाम काढला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपली संपूर्ण ताकद लावली खरी पण विकेट काही मिळत नव्हती. यादरम्यान विराट कोहलीने काळी जादू केली.

पाहा व्हिडीओ-

विराट कोहलीने 27 वी ओव्हर संपल्यावर स्टंप्सच्या बेल बदली केल्या. त्यानंतर 28 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या शेवटच्या बॉलवर दुसरी विकेट गेली. टोनी डी जोर्जी 28 धावांवर परतला. विराट कोहलीने बेल्स बदली केल्यावर विकेट गेल्याने सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.