मुंबई : राजस्थानच्या सरिस्का (Sariska) व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात लागलेली भीषण आग अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही, मात्र याच दरम्यानचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali Tedulkar) व्याघ्र प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे वादात सापडल्या आहे. या ठिकाणचे डायरेक्टर आग विझवायला प्राधान्य न देता अंजली तेंडुलकर यांना वाघ दाखवायला घेऊन गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. ते एकत्र फिरतानाचा एक फोटोही सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या तीन दिवसात या पार्कमधील जवळपास 20 एकर क्षेत्र या भीषण आगीत जळून खाक झाले आहे. याचदरम्यान 27 मार्चला अंजली तेंडुलकर या पार्कमध्ये आल्या होत्या. आणि त्यांना पार्क दाखवण्याच्या व्हीआयपी ड्युटीवर इतर बडे अधिकारी लागल्याचेही बोलते जात आहे. त्या केवळ 15 मिनिटे आधी वायरलेसवर अधिकाऱ्यांना पार्कमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती.
View this post on Instagram
आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी आग विझवण्याला प्राधान्य देतील अशी अपेक्षा होती. मात्र तरीही अधिकारी अंजली तेंडुलकर यांना पार्कमधील वाघ दाखवायला घेऊन गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत पार्कच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, डायरेक्टर आर. एन. मीणा यांना सांगितले की, आग विझवण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. आणि रेंजरही घटनास्थळी दाखल झाले होते. आग लागल्यानंतर डायरेक्टर ती आग विझवायला जात नाही. तसेच व्हीआयपी प्रोटोकॉलनुसार अंजली तेंडुलकर यांना सेवा पुरवल्या जात होत्या, असेही त्यांनी सांगितले आहे. या आगीवर अजूनही पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये.
या प्रदेशातील वाघ डोंगर परिसरातून खाली मैदान परिसरात आले आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. ही आग विझवण्यासाठी वायुसेनेलाही पाचारण करण्यात आले आहे. आणि वायुसेनेतर्फे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आग विझवण्यासाठी या ठिकाणी दोन हेलिकॉप्टरही बोलवण्यात आले आहेत. एका फेरीत एक हेलिक्टर तब्बल चार हजार लिटर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. असे दिवसात अकरा राऊंड केले जात आहेत. मात्र अद्यापही ही आग पूर्ण विझलेली नाहीये.
शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी? Chandrasekhar Bavankule यांनी सांगितलं कारण