AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SAW vs INDW, 3rd T20i : टीम इंडियातून दोघींचा पत्ता कट, अमरावतीकर खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी

South Africa Women vs India Women 3rd T20I Playing 11 : सलग 2 सामने गमावल्यानंतर वुमन्स टीम इंडियात बदल करण्यात आले आहेत. टीम मॅनेजमेंटने दोघींना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जाणून घ्या प्लेइंग ईलेव्हन.

SAW vs INDW, 3rd T20i : टीम इंडियातून दोघींचा पत्ता कट, अमरावतीकर खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी
The Wanderers Stadium JohannesburgImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 22, 2026 | 10:59 PM
Share

वुमन्स टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक टी 20i सामन्यात विजेने विघ्न घातलं. वीजेमुळे टॉस आणि सामन्याला सुरुवात होण्यास विलंब झाला. नियोजित वेळेनुसार सामन्याला रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात तर 9 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र विजेने खोडा घातल्याने 45 मिनिटांच्या विलंबाने टॉस झाला. तर 30 मिनिटं उशिराने सामन्याला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार रात्री 10 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 9 वाजून 45 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन लॉरा वॉल्वार्ड्ट हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

दोन्ही संघांकडून बदल

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 2-2 बदल केले आहेत. अयाबोंगा खाका आणि अनेके बॉश या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करण्यात आलंय. तर त्यांच्या जागी अयांडा हलुबी आणि कायला रेनेके यांचा समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियातून कुणाचा पत्ता कट?

टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमधून श्री चरणी आणि डेब्युटंट अनुष्का शर्मा या दोघींना विश्रांती देण्यात आली आहे. तर अमरावतीकर भारती फुलमाळी आणि काश्वी गौतम यांचा समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ सामना

दरम्यान टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2 सामन्यांनंतर 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियावर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. तर सलग 2 सामने जिंकल्याने विजयी हॅट्रिक करुन मालिका नावावर करण्यासाठी दक्षिण आफ्रिका उत्सूक आहे. त्यामुळे टीम इंडियाची महिला ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन मालिकेत आव्हान कायम राखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वॉल्वार्ड्ट (कॅप्टन), सुने लुस, ताझमिन ब्रिट्स, ॲनेरी डर्कसेन, कायला रेनेके, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), आयंदा हलुबी, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको मलाबा.

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रीग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), भारती फुलमाळी, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, काशवी गौतम, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील आणि रेणुका सिंग ठाकुर.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल