AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH IPL 2024 : मॅच दरम्यान शाहरुख खानच्या एका कृतीवरुन मोठा वाद, ट्रोलर्सनी खूप सुनावलं

आयपीएल दरम्यान शाहरुख खान आतापर्यंत अनेकदा वादात अडकला आहे. शाहरुख वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाहीय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ग्राऊंड स्टाफसोबत वाद घातल्यामुळे अनेक वर्ष स्टेडियममधील त्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. काल कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबादचा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान उपस्थित होता.

KKR vs SRH IPL 2024 : मॅच दरम्यान शाहरुख खानच्या एका कृतीवरुन मोठा वाद, ट्रोलर्सनी खूप सुनावलं
Shahrukh Khan KKR vs SRH MatchImage Credit source: PTI
| Updated on: Mar 24, 2024 | 9:41 AM
Share

आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने होम पीच इडन गार्डन्सवर जबरदस्त फलंदाजीच प्रदर्शन केलं. आंद्रे रसेलने स्फोटक बॅटिंग केली, ज्यासाठी तो ओळखला जातो. रसेलने गोलंदाजांना धोपटून काढत सिक्सचा पाऊस पाडला. रसेलने त्याच्या बॅटिंगने केकेआरच्या फॅन्सना जिंकलच पण टीमचा मालक शाहरुख खानही आनंदात होता. पण या दरम्यान शाहरुखच्या एका कृतीवरुन आता वाद निर्माण झालाय. आयपीएलचा नवीन सीजन सुरु झालाय. टीमचा पहिला सामना होम ग्राऊंड इडन गार्डन्सवर झाला. ही मॅच पाहण्यासाठी शाहरुख खान उपस्थित होता. शाहरुखला पाहून कोलकाताच्या फॅन्सना भरपूर जोश आला होता. ते शाहरुखच्या नावाने घोषणाबाजी करत होते.

शाहरुखने सुद्धा आपल्या चाहत्यांबद्दल प्रेम व्यक्त केलं. नेहमीच्या स्टाइलमध्ये चाहत्यांच्या दिशेने हात उंचावून अभिवादन केलं. फ्लाइंग किस दिली. शाहरुखने टीमच्या बॅटिंगचा सुद्धा आनंद घेतला. अचानक या दरम्यान शाहरुख सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला. शाहरुखला स्मोकिंगची सवय आहे. इडन गार्डन्सवर सुद्धा तो या सवयीवर नियंत्रण ठेऊ शकला नाही. कोलकाताच्या इनिंग दरम्यान शाहरुख स्टेडियमच्या कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसून मॅचचा आनंद घेत होता. या दरम्यान तो सिगारेट पिताना दिसला.

हे फोटो व्हायरल झाले

टीव्ही स्क्रिनवर शाहरुखच्या स्मोकिंगच दृश्य दिसताच सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. अनेक यूजर्सनी शाहरुखला भरपूर सुनावलं. आजच्या युवकांसाठी यातून चुकीचा संदेश जातोय, असं काही युजर्सनी म्हटलं.

आयपीएलमधल्या वादांशी शाहरुखच जुन नात

आययपीएलमधल्या वादांशी शाहरुख खानच जुन नात आहे. आयपीएल सामना सुरु असताना, स्टेडियममध्ये सिगारेट पिण्याची त्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 2012 च्या सीजनमध्येही शाहरुख स्टेडियममध्ये सिगारेट पिताना दिसला होता. त्यावेळी जयपूरच सवाई मानसिंह स्टेडियम होतं. या प्रकरणी जयपूरच्या लोकल कोर्टात त्याच्याविरोधात केस दाखल झाली होती. त्याशिवाय मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ग्राऊंड स्टाफसोबत वाद घातल्यामुळे अनेक वर्ष स्टेडियममधील त्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.