AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय झाले, विश्वविजेतेपद जिंकल्यावर शेफालीला अश्रू रोखता आले नाही, पाहा Video

चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा खूपच भावूक झाली. विजेतेपद घेताना शेफाली वर्मा काही वेळ रडत राहिली.

काय झाले, विश्वविजेतेपद जिंकल्यावर शेफालीला अश्रू रोखता आले नाही, पाहा Video
शेफाली वर्मा
| Updated on: Jan 30, 2023 | 9:57 PM
Share

भारताच्या महिला संघाने इंग्लंडला 7 विकेटने (India vs England ) हरवून अंडर 19 विश्वचषकाचे विजेतेपद (Women Under-19 World Cup)पटकवले. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची टीम ढेपाळली. भारताला विजयासाठी हव्या असणाऱ्या 69 धावा 36 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण झाल्या.भारतीय महिला संघाने केलेल्या या भीमपराक्रमामुळे सर्व देशभर आनंदोत्सव साजरा होत आहे. त्याच वेळी संघाची कर्णधार शेफाली वर्माचा (Shefali Verma)एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शेफालीला अश्रू रोखणे कठीण झाले होते.

चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा खूपच भावूक झाली. विजेतेपद घेताना शेफाली वर्मा काही वेळ रडत राहिली. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शेफाली वर्माने एक दिवस आधी तिचा वाढदिवस साजरा केला होता, त्यामुळे विश्वचषक विजयाने तिचा वाढदिवस अधिक खास झाला.

भारताच्या ज्युनियर किंवा सीनियर महिला संघाने यापूर्वी कधीही विश्वचषक जिंकला नव्हता. 2005 आणि 2017 च्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताच्या वरिष्ठ संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी 2020 महिला टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. रिचा घोष आणि शेफाली वर्मा देखील त्या T20 संघाचा भाग होत्या.

बीसीसीआयचे आभार

शेफाली वर्माने विश्वचषक विजेतेपदावर सांगितले की, ‘सर्व मुली ज्या प्रकारे परफॉर्म करत आहेत आणि एकमेकांना सपोर्ट करत आहेत त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आमचा सपोर्ट स्टाफ , आम्हाला पाठिंबा देत सांगत होता की आम्ही चषक जिंकण्यासाठी येथे आला आहोत.या सर्वांचे आभार. खेळाडूंनी मला खूप साथ दिली. तसेच मला हा संघ दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार.

श्वेताचे केले कौतूक

श्वेता सेहरावतचे कौतुक करताना शेफाली म्हणाली, ‘श्वेता सेहरावत उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तिने सर्व गेम प्लॅन फॉलो केले. केवळ तिच नाही, तर अर्चना, सौम्या व इतरांनी शानदार खेळ केला. सर्व काही अविश्वसनीय आहेत. आता भारतीय वरिष्ठ संघ टी-२० विश्वचषक जिंकेल, असे शेफाली म्हणाली.

तीन वर्षांपुर्वी पराभव

तीन वर्षांपूर्वी वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. शेफाली वर्मा त्या टीमचा भाग होती. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात 2020 महिला टी 20 वर्ल्ड कपचा फायनल सामना झाला. ऑस्ट्रेलियाने 185 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 99 धावात आटोपला होता. आता 2023 मध्ये पोचेफस्ट्रूम येथे वर्ल्ड कप विजयाने मनात असलेली ती सल भरुन निघाली. या प्रसंगी शेफाली वर्माच्या डोळ्यात आनंदश्रू तरळले. भारतीय महिला क्रिकेटने वास्तवात एक मोठा टप्पा गाठलाय.

भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.