
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला टी20 सामना भारताने 48 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने 238 धावा केल्या होत्या. पण न्यूझीलंडला फक्त 190 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. त्याच्या खेळामुळे हा विजय सोपा झाला. त्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या व्यतिरिक्त आणखी एक खेळाडू चर्चेत आला. पण हा खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी… हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अष्टपैलू शिवम दुबे आहे. प्रथम फलंदाजी करताना काही खास करू शकला नाही. शिवम दुबे फक्त 4 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. तर गोलंदाजीत शिवम दुबेने 3 षटकं टाकली आणि 28 धावा देत 2 गडी बाद केले. असं असताना त्याच्या कामगिरीची नाही तर त्याच्या हेअरस्टाईलची चर्चा होत आहे.
शिवम दुबेच्या हेअरस्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण त्याच्या हेअरस्टाईलने 90च्या दशकात जन्मलेल्या लोकांना आईची आठवण करून दिली. कारण त्याची हेअरस्टाईल 90च्या दशकातील आईची आवडती हेअरस्टाईल होती. डोक्यावर खूप सारं तेल थापून एका बाजूला भांग पाडायचा आणि केस चपटे ठेवायचे. अगदी तशीच हेअरस्टाईल शिवम दुबेने ठेवली होती. त्याच्या हेअरस्टाईलवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने तर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील बागा या पात्राशी त्याचं नातं जोडलं आहे. तर एका युजर्सने सचिन तेंडुलकरच्या स्टाईलसोबत तुलना केली. यासाठी त्याने संदर्भासहीत फोटो टाकला आहे.
Shivam dube hairstyle is inspired by lord Bagha pic.twitter.com/sugNSeC1r3
— MeetPatel (@im_mpatel) January 22, 2026
Obvious Shivam Dube hairstyle inspiration pic.twitter.com/OT9kEKXzI0
— Ramesh (@rmshnt27) January 22, 2026
राजस्थान रॉयल्सने शिवम दुबेचा एक व्हिडीओ शेअर करत त्यावर पोस्ट लिहिली की, सर्व भारतीय आईंची आवडती हेअरस्टाईल.
Every Indian mother’s fav hairstyle 😂💗 pic.twitter.com/gwuAczvONN
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 23, 2026
शिवम दुबेकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खूप अपेक्षा आहेत. कारण अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू हा भारताचा कणा आहे. हार्दिक पांड्या, अक्षर पटेलनंतर शिवम दुबेकडून तशाचा कामगिरीची अपेक्षा आहे.