AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: आधी 6 कोटी मिळाले, आता टीम इंडियात संधी, Shivam Mavi मध्ये असं काय आहे?

IND vs SL: हार्दिक पंड्या कॅप्टन बनताच शिवम मावीची टीम इंडियात एंट्री झाली. सिलेक्टर्सनी त्याच्यावर विश्वास दाखवला, त्यामागे 'ही' कारणं आहेत.

IND vs SL: आधी 6 कोटी मिळाले, आता टीम इंडियात संधी, Shivam Mavi मध्ये असं काय आहे?
Shivam maviImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Dec 28, 2022 | 12:10 PM
Share

मुंबई: श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी 20 आणि वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. टीम इंडियात अनेक मोठे बदल झाले आहेत. ऋषभ पंतला टी 20 आणि वनडे टीममधून आपलं स्थान गमवाव लागलय. केएल राहुलला सुद्धा टी 20 टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. राहुलची वनडे टीममध्ये निवड झालीय. पण त्याला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलय. शिखर धवनला सुद्धा वनडे टीममधून ड्रॉप केलय. या मोठ्या खेळाडूंना बाहेर केल्यानंतर एका युवा खेळाडूला टीम इंडियात स्थान मिळालय. या खेळाडूच नाव आहे शिवम मावी. त्याला नवीन वर्षाच गिफ्ट मिळालय.

शिवम मावी सर्वप्रथम कधी चर्चेत आला?

शिवम मावी वेगवान गोलंदाज आहे. 24 वर्षांचा हा खेळाडू सर्वप्रथम 2018 साली चर्चेत आला. त्याने अंडर 19 टीमच्या वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतरच्या वर्षी झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये शिवम मावीला कोलकाता नाइट रायडर्स टीमने विकत घेतलं. आता हा खेळाडू हार्दिक पंड्याची आयपीएल टीम गुजरात टायटन्सचा भाग आहे. त्याला 6 कोटी रुपयांना विकत घेतलं. हार्दिक पंड्या टीम इंडियाच्या टी 20 टीमचा कॅप्टन आहे. शिवम मावीची टी 20 संघात एंट्री झालीय.

शिवम मावीला टीम इंडियात का मिळालं स्थान?

शिवम मावीला टीम इंडियात स्थान मिळालं, त्यामागे एक प्रमुख कारण आहे. शिवम मावी विकेट-टेकर बॉलर आहे. त्याच्या गोलंदाजीत वेग आहे. नवा चेंडू हाताळण्याबरोबर मिडल आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. शिवम मावीकडे कमालीचा स्लोअर चेंडू आहे. कठीण परिस्थितीत तो चांगली गोलंदाजी करु शकतो. मावीच वय आता फक्त 24 वर्ष आहे. पण मागच्या 4 वर्षांपासून तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडतोय. शिवम मावीने आतापर्यंत किती विकेट काढल्यात?

शिवम मावीने 10 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 44 विकेट काढल्यात. त्याशिवाय 36 लिस्ट ए सामन्यात 59 विकेट काढलेत. टी 20 मध्ये शिवमने 46 विकेट काढल्यात. आकड्यांवरुन स्पष्ट होतं, शिवम मावी विकेट-टेकर गोलंदाज आहे. त्यामुळेच कदाचित आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि आता सिलेक्टर्सनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.