IND vs BAN: टीम इंडिया-बांगलादेश सामन्यातील गोलंदाजाच्या दुखापतीबाबत कॅप्टनकडून मोठी अपडेट
India vs Bangladsh: टीम इंडिया-बांगलादेश सराव सामना गोलंदाजाला चांगलाच महागात पडला. सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे या गोलंदाजाला मैदानाबाहेर जावं लागलं. आता हा गोलंदाज रुग्णालयात आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेआधी सराव सामना पार पडला. टीम इंडियाने या सामन्यात बांगलादेशवर 60 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 122 धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशला या पराभवासह दुहेरी झटका लागला आहे. बांगलादेशचा गोलंदाज शोरिफुल इस्लाम याला बॉलिंगदरम्यान दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. बांगलादेशचा गोलंदाज हा अद्याप रुग्णालयात असल्याची माहिती कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने साम्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान दिली. त्यामुळे आता बांगलादेशच्या गोलंदाजाला पुढील सामन्यांना मुकावं लागणार की काय? अशी भीती बांगलादेशी क्रिकेट चाहत्यांना आहे.
नक्की काय झालं?
शोरिफूल इस्लाम टीम इंडियाच्या डावातील शेवटची 20 ओव्हर टाकत होता. शोरिफूलने ओव्हरमधील पाचव्या बॉलवर यॉर्कर टाकला. पण बॅटिंग करत असलेल्या हार्दिक पंड्याने जोरात फटका मारला. हार्दिकने मारलेला फटका शोरिफूलने रोखण्याचा प्रयत्न केला. शोरिफूलच्या या प्रयत्नात बॉल त्याच्या हाताला लागला. शोरिफूलला जोरात फटका लागला. शोरिफूल वेदनने विव्हळला. नॉन स्ट्राईक एंडवर टीम इंडियाचा रवींद्र जडेजा होता.
शोरिफूलला वेदनेने विव्हळताना पाहून रवींद्र जडेजा त्याची विचारपूस करु लागला. तितक्यात बांगलादेशच्या फिजीओने धावत मैदानात एन्ट्री घेतली आणि शोरिफूलजवळ येऊन पोहचला. फिजीओने पाहणी केली. त्यांनतर फिजीओ शोरिफूलला मैदानाबाहेर घेऊन गेला. शोरिफूल बाहेर गेल्याने उर्वरित एक बॉल तंझीम हसन याने टाकला.
दरम्यान सामन्यानंतर कॅप्टन नजमूल हुसैन शांतोने शोरिफूलबाबत मोठी अपडेट दिली. शोरिफूल अजूनही रुग्णालयात आहे, असं नजमूलने सांगितलं. त्यामुळे आता नजमूलच्या दुखापतीचं काय होतं, याकडे बांगलादेश क्रिकेटचं लक्ष असणार आहे.
शोरिफूल इस्लामला जबर दुखापत
— Bangladesh vs Sri Lanka (@Hanji_CricDekho) June 1, 2024
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
बांगलादेश प्लेईंग टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), सौम्या सरकार, तौहीद ह्रदोय, साकिब अल हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकिब आणि तन्वीर इस्लाम.
