AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Final आधी श्रेयस अय्यर याने बीसीसीआयला सुनावलं, म्हणाला…..

Shreyas Iyer KKR vs SRH Ipl Final 2024 : टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्याआधी बेधडक प्रतिक्रिया दिली आहे.

IPL 2024 Final आधी श्रेयस अय्यर याने बीसीसीआयला सुनावलं, म्हणाला.....
shreyas iyer on bcci over to back pain
| Updated on: May 26, 2024 | 4:08 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम आणि अखेरचा सामना आज 26 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात ट्रॉफीसाठी महामुकाबला होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने या सामन्याआधी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिलं. श्रेयसने या दरम्यान बीसीसीआयला चांगलंच सुनावत निशाणा साधला. श्रेयसच्या या वक्तव्याची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. श्रेयस नक्की काय आणि कोणत्या मुद्द्यावरुन म्हणाला? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियासाठी खेळत नसलेल्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट टीमसाठी खेळावं, असं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. मात्र ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी बीसीसीआय सचिवांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली. परिणामी या दोघांना वार्षिक करारातून डच्चू देण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर याला पाठीच्या त्रासामुळे खेळता आलं नाही. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर याने आदेश मानत रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला आणि मुंबईचं सेमी फायनल आणि फायनलमध्ये प्रतिनिधित्व केलं. मात्र तोवर जे घडायचं होतं, ते घडलेलं होतं. अर्थात त्याला वार्षिक करारातून वगळण्यात आलं होतं. श्रेयसच्या पाठदुखीने त्याची रणजी ट्रॉफी फायनलमध्ये ‘पाठ’ सोडली नाही. श्रेयसला या त्रासामुळे अंतिम सामन्यातून2 दिवस मैदानाबाहेर रहावं लागलं होतं. आता या सर्व महाभारतावरुन आयपीएल 2024 महामुकाबल्याआधी श्रेयसने सर्व काही बोलून टाकलंय.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

“मी वनडे वर्ल्ड कपनंतर संघर्ष करत होतो. मी माझ्या त्रासाबाबत (पाठदुखीबाबत) सांगितलं, तेव्हा यावर कुणीच सहमती दर्शवली नाही. मात्र ही लढाई आता माझ्याशीच होती. मी जेव्हा आलो तेव्हा आयपीएल स्पर्धा तोंडावरच होती. सर्वोत्तम कामगिरी करावी, हीच माझी अपेक्षा होती”, असं श्रेयसने म्हटलं. तसेच यानंतर श्रेयसने वार्षिक कराराबाबतही प्रतिक्रिया दिली.

आपल्याला वार्षिक करारातून वगळल्यावरुन श्रेयस अय्यर याने मनातील भावना व्यक्त केली. मी फक्त वर्तमानात राहण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत भविष्यात काय होईल? याचा विचार मी केला नाही. तसेच माझी निवड होणार की नाही? याबाबत मी चिंता केली नाही”, असं श्रेयसने स्पष्ट केलं.

कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, चेतन साकरिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि अल्लाह गझनफर.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, उमरान मलिक आणि विजयकांत व्यासकांत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.