IND vs ENG | श्रेयस अय्यरचा कडक कॅच, झॅक क्रॉलीला दाखवला मैदानाबाहेरचा रस्ता,व्हीडिओ बघाच

Shreyas Iyer Catch | झॅक क्रॉली आक्रमक खेळीसह शतकाच्या दिशेने आगेकूच करत होता. तर टीम इंडिया विकेटच्या शोधात होती. अक्षर पटेल याने टीम इंडियाला विकेट मिळवून दिली. श्रेयस अय्यर याने झॅकच्या घेतलेल्या कॅचमुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

IND vs ENG | श्रेयस अय्यरचा कडक कॅच, झॅक क्रॉलीला दाखवला मैदानाबाहेरचा रस्ता,व्हीडिओ बघाच
| Updated on: Feb 03, 2024 | 2:30 PM

विशाखापट्टणम | टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पहिला डाव हा 396 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 209 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने 396 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने 59 धावांची भागीदारी केली. कुलदीप यादव याने टीम इंडियाला ब्रेक थ्रू मिळवून दिला. कुलदीपने बेन डकेट याला 21 धावांवर आऊट करत इंग्लंडला पहिला झटका गिला. त्यानंतर ओली पोप मैदानात आला.

ओली पोप आणि झॅक क्रॉली या जोडीने पुन्हा एकदा डाव ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. मात्र श्रेयस अय्यर याने घेतलेल्या अप्रतिम कॅचमुळे इंग्लंडला दुसरा झटका लागला. श्रेयसने उलट धावत झॅक क्रॉलीचा सुपर कॅच घेतला. त्यामुळे झॅकला 76 धावांवर मैदानाबाहेर जावं लागलं. झॅकने 78 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने ही खेळी केली.

अशी घेतली कॅच

इंग्लंडच्या डावातील 23 वी ओव्हर अक्षर पटेल टाकायला आला. अक्षरच्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर झॅकने फटका माराला. मात्र श्रेयसने उलट धावत जात कॅच घेतला. श्रेयसने घेतलेल्या कॅचमुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा ट्रेव्हिस हेड याने वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित शर्मा याचा घेतलेला कॅच आठवल्याशिवाय राहिला नाही.

श्रेयस अय्यरचा अफलातून कॅच

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.