GT vs SRH : वादग्रस्त रन आऊट, शुबमन गिलची सटकली, कॅप्टनने थर्ड अंपायरसह काय केलं? पाहा व्हीडिओ

Shubman Gill Unhappy With 3rd Umpire Michael Gough : शुबमन गिल याला रन आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. शुबमनने या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. यावरुन आता सोशल मीडियावरही चर्चा पाहायला मिळत आहे.

GT vs SRH : वादग्रस्त रन आऊट, शुबमन गिलची सटकली, कॅप्टनने थर्ड अंपायरसह काय केलं? पाहा व्हीडिओ
Shubman Gill Unhappy With 3rd Umpire Michael Gough
Image Credit source: Social Media
| Updated on: May 02, 2025 | 10:04 PM

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 51 वा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सने पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 224 धावांपर्यंत मजल मारली आहे. गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. त्यानंतर शुबमन गिल रन आऊट झाला. मात्र शुबमन गिल याला थर्ड अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही. अंपायरने दिलेला निर्णय वादग्रस्त ठरल्याने शुबमनला संताप अनावर झाला. शुबमन थर्ड अंपायरने आऊट दिल्यानंतर मैदानाबाहेर गेला. शुबमन मैदानाबाहेर पोहचताच तिथे असलेल्या थर्ड अंपायर मायकल गॉ यांच्या दिशेने गेला आणि नाराजी व्यक्त केली.

शुबमन थर्ड अंपायरच्या निर्णयावर फार नाराज होता. शुबमनने मैदानात आणि मैदानाबाहेरही आपली नाराजी व्यक्त केली. हा सर्व प्रकार गुजरातच्या डावातील 13 व्या ओव्हरमध्ये घडला.

शुबमन गिलसोबत नक्की काय झालं?

हैदराबादकडून झीशान अन्सारी याने गुजरातच्या डावातील 13 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर जोस बटलर याने फटका मारला आणि एकेरी धावेसाठी पळाला. मात्र तेव्हा हर्षल पटने याने नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने बॉल फेकला. हर्षलने फेकलेला बॉल विकेटकीपर हेनरिक क्लासेन याने स्टंप्सला लावला. त्यानंतर हैदराबादकडून जोरदार अपील करण्यात आली.

आणि गिल संतापला

शुबमन गिल नाराज

फिल्ड अंपायरने गिल आऊट आहे की नाही? हे स्पष्ट करण्यासाठी थर्ड अंपायरची मदत घेतली. बराच वेळ घेतल्यानंतर थर्ड अंपायरने मायकल गॉ यांनी गिल रन आऊट असल्याचं स्पष्ट केलं. मात्र विकेटकीपर हेनरिक क्लासेन याचा बॉलआधी स्टंप्सला हात लागला. त्यामुळे नॉट असल्याचा दावा गिलने केला. मात्र थर्ड अंपायरने गिल आऊट असल्याचा अंतिम निर्णय दिला. त्यामुळे नाराज आणि संतापलेल्या गिलने मैदान सोडलं. त्यानतंर गिलने थर्ड अंपायरसमोर आपली नाराजी व्यक्त केली. गिलच्या या रन आऊट प्रकरणावरुन आता सोशल मीडियावरही चर्चा पाहायला मिळत आहे.