AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH : गिल-बटलरची वादळी खेळी, हैदराबादसमोर 225 रन्सचं टार्गेट, अहमदाबाममध्ये एसआरएच जिंकणार?

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad 1st Innings Highlights : गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात घरच्या मैदानात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 200 पार मजल मारली आहे. गुजरातने हैदराबादसमोर 225 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

GT vs SRH : गिल-बटलरची वादळी खेळी, हैदराबादसमोर 225 रन्सचं टार्गेट, अहमदाबाममध्ये एसआरएच जिंकणार?
Jos Buttler and Shubman Gill GT vs SRH IPL 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 02, 2025 | 9:42 PM
Share

कर्णधार शुबमन गिल आणि जोस बटलर या जोडीने केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल 2025 मधील 51 व्या सामन्यात पाहुण्यात सनरायजर्स हैदराबादसमोर 225 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. गुजरातसाठी शुबमन आणि जोस या दोघांव्यतिरिक्त ओपनर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनीही योगदान दिलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आतापर्यंत 205 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. त्यामुळे आता हैदराबादला हा सामना जिंकायचा असले तर विक्रमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. हैदराबादने याआधी असं करुन दाखवलं आहे. त्यामुळे हैदराबादचे फलंदाज झंझावाती खेळी करुन प्लेऑफमधील आव्हान कायम राखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

गुजरातची वादळी बॅटिंग

गुजरातसाठी पहिल्या 4 फलंदाजांनी धमाकेदार बॅटिंग केली. त्यामुळे गुजरातला 200 पार मजल मारता आली. गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. गिलने 38 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 76 धावा केल्या. गिलच्या या खेळीत 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. गिलनंतर बटलर याने सर्वात जास्त धावा कुटल्या. बटलरने 37 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह 64 रन्स केल्या.

साई सुदर्शनचं अर्धशतक हुकलं

त्याआधी ओपनर साई सुदर्शन याचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. साईने 23 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याने 16 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. तर त्यानंतर शाहरुख खान आणि राहुल तेवतिया या दोघांनी प्रत्येकी 6-6 धावा केल्या. तर गुजरातकडून वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर झीशान अन्सारी आणि कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

हैदराबाद 225 चेज करणार?

हेड-शर्मा जोडीवर मोठी जबाबदारी

दरम्यान सनरायजर्स हैदराबादसाठी प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. त्यामुळे हैदराबादला कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. हैदराबादला जिंकायचं असेल तर त्यांची स्फोटक जोडी ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. या दोघांनी याआधी अनेकदा स्फोटक सुरुवात करुन दिली आहे. त्यामुळे जर ही जोडी सेट झाली तर हैदराबादला एकहाती विजय मिळवून देईल, यात शंका नाही. मात्र आता यात कोण यशस्वी ठरतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.