SL vs BAN 2nd Test : श्रीलंका की बांगलादेश? सामन्यासह मालिका कोण जिंकणार?

Sri lanka vs Bangaldesh Test Series 2025 : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 0-0 ने बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम सामना कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

SL vs BAN 2nd Test : श्रीलंका की बांगलादेश? सामन्यासह मालिका कोण जिंकणार?
Sri lanka vs Bangaldesh Test Series 2025
Image Credit source: sri lanka cricket x account
| Updated on: Jun 24, 2025 | 10:48 PM

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या चौथ्या साखळीचा भाग आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे मालिका 0-0 ने बरोबरीत आहे. त्यानंतर आता दोन्ही संघ दुसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांनी या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. नजमुल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. तर ऑलराउंडर धनंजय डी सिल्वा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना केव्हा?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना बुधवार 25 जून ते रविवार 29 दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना सिंहली स्पोर्ट्ल कल्ब, कोलंबो येथे आयोजित करण्यात आला आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव्ह आणि फॅनकोड एपद्वारे पाहायला मिळेल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हे दोन्ही संघ आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकूण 27 वेळा आमेनसामने आले आहेत. श्रीलंका टेस्ट क्रिकेटमध्ये बांगलादेशवर वरचढ राहिली आहे. श्रीलंकेने बांगलादेश विरुद्ध 27 पैकी 20 सामने जिंकले आहेतय. बांगलादेशला फक्त 1 सामनाच जिंकता आला आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.