AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs NZ 2nd Test: दिनेश चांदीमलचं 16 वं शतक, न्यूझीलंडविरुद्ध दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी

Dinesh Chandimal Century : श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज दिनेश चांदीमल याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कारकीर्दीतील 16 वं शतक ठोकलं. दिनेशने यासह माजी दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

SL vs NZ 2nd Test: दिनेश चांदीमलचं 16 वं शतक, न्यूझीलंडविरुद्ध दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी
dinesh chandimal centuryImage Credit source: Sri Lanka X Account
| Updated on: Sep 26, 2024 | 6:30 PM
Share

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा गॉल येथे खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. न्यूझीलंडने पाथुम निसांका याला 1 धावेवर बाद केलं. त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चांदीमल या दोघांनी 122 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आऊट झाला.दिमुथचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. दिमुथने 109 बॉलमध्ये 4 फोरसह 46 रन्स केल्या. त्यानंतर दिनेस चांदीमल आणि अँजलो मॅथ्युज या जोडीने तिसर्‍या विकेटसाठी 97 धावा जोडल्या. श्रीलंकेने 221 धावांवर तिसरी विकेट गमावली. दिनेश चांदीमल याला ग्लेन फिलिप्स याने क्लिन बोल्ड केलं.

दिनेशने 208 बॉलमध्ये 16 फोरसह 116 रन्स केल्या. दिनेशने या शतकी खेळीदरम्यान माजी दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी केली. दिनेशने सनथ जयसूर्या यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये 50+ धावांच्या खेळीच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. दिनेशने न्यूझीलंड विरूद्धच्या या शतकी खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी केली. दिनेशने सामन्यातील 26 व्या षटकात 81 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. दिनेशच्या कसोटी कारकीर्दीतील हे 45वं अर्धशतक ठरलं. दिनेशने यासह जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी साधली.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम हा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्या नावे आहेत. त्यानंतर महेला जयवर्धने दुसऱ्या, अँजलो मॅथ्यूज तिसऱ्या आणि दिमुथ करुणारत्ने चौथ्या स्थानी विराजमान आहेत. त्यानंतर दिनेश आणि सनथ जयसूर्या अनुक्रमे पाचव्या क्रमांकावर आहेत.

श्रीलंकेसाठी कसोटीत सर्वाधिक 50+ धावा

कुमार संगकारा – 90 महेला जयवर्धने – 84 अँजलो मॅथ्यूज – 59 दिमुथ करुणारत्ने – 55 दिनेश चांदीमल – 45 सनथ जयसूर्या – 45

दिनेश चांदीमलची शतकी खेळी

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.

डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?.
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?.
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.