अजिंक्य रहाणे याचा तडाखा, सलग दुसरं विस्फोटक अर्धशतक, अनसोल्ड राहिल्याचा राग काढला, पाहा व्हीडिओ

Ajinkya Rahane Fifty : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने धमाका केला आहे. अजिंक्यने नक्की काय केलंय? पाहा व्हीडिओ

अजिंक्य रहाणे याचा तडाखा, सलग दुसरं विस्फोटक अर्धशतक, अनसोल्ड राहिल्याचा राग काढला, पाहा व्हीडिओ
ajinkya rahane smat mum vs kerla
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 12:06 AM

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मधील पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरला. मात्र कोलकाताने अजिंक्यला दुसर्‍या फेरीत 1.50 कोटी या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. अजिंक्यने सोल्ड होताच धमाका केला. अजिंक्यने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 टी 20 स्पर्धेत मुंबईकडून खेळताना सलग 2 शतकं झळकावली आहेत. अजिंक्यने महाराष्ट्रनंतर आता केरळविरुद्ध 29 नोव्हेंबरला स्फोटक अर्धशतकी खेळी केली. अजिंक्यने यासह केकेआरची त्याची केलेली निवड योग्य ठरवली.

केरळ विरुद्ध मुंबई यांच्यात राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात अजिंक्यने विजयी धावांचा पाठलाग करताना ही खेळी केली. मुंबईचा या सामन्यात 43 धावांनी पराभव झाला. केरळने विजयासाठी दिलेल्या 235 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 191 धावांपर्यंत मजल मारता आली. अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईला विजयी होता आलं नाही. मात्र अजिंक्यचा या सलग दुसऱ्या अर्धशतकामुळे विश्वास दुणावला असले, इतकं मात्र निश्चित.

अजिंक्यने केरळविरुद्ध 35 चेंडूत 194.29 च्या स्ट्राईक रेटने 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. अजिंक्यने त्याआधी बुधवारी 27 नोव्हेंबरला मुंबईविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. रहाणेने या अर्धशतकी खेळीसह विजयात निर्णायक योगदान दिलं होतं. मुंबईला महाराष्ट्रने 172 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान कॅप्टन श्रेयस अय्यर याच्या 71 आणि अजिंक्यच्या 72 धावांच्या मदतीने 17.1 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. अजिंक्यने महाराष्ट्रविरुद्ध 34 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली होती.

रहाणेचं सलग दुसरं अर्धशतक

केकेआरसाठी खेळणार

दरम्यान अजिंक्य गेल्या हंगामापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत होता. मात्र चेन्नईने अजिंक्यला करारमुक्त केलं. अजिंक्यने गत मोसमात (IPL 2024) उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र त्यानंतरही चेन्नईने त्याला रिलीज केलं. त्यामुळे अजिंक्य दीड कोटींच्या बेस प्राईजसह ऑक्शनमध्ये उतरला. अजिंक्यसाठी पहिल्या फेरीत कुणीच रस दाखवला नाही. त्यामुळे रहाणे अनसोल्ड राहिला. मात्र दुसऱ्या फेरीत केकेआरने अजिंक्यला बेस प्राईजमध्येच घेतलं.

दरम्यान आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील कामगिरी अजिंक्यने आयपीएलमध्येही कायम ठेवावी, अशी आशा टीम मॅनेजमेंटला असणार आहे. तसेच अजिंक्य रहाणे कर्णधारपदासाठीही प्रबळ दावेदार असणार आहे. त्यामुळे अजिंक्यला केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा मिळू शकते.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.