SMAT 2025 : साई सुदर्शनचा शतकी तडाखा, संघाला सहज मिळवून दिला विजय

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत तामिळनाडू आणि सौराष्ट्र यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात तामिळनाडूकडून खेळताना साई सुदर्शनने शतक ठोकलं. त्याच्या या खेळीमुळे संघाला सहज विजय मिळाला.

SMAT 2025 : साई सुदर्शनचा शतकी तडाखा, संघाला सहज मिळवून दिला विजय
SMAT 2025 : साई सुदर्शनचा शतकी तडाका, संघाला सहज मिळवून दिला विजय
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 08, 2025 | 10:10 PM

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामना पार पडले. या फेरीत तामिळनाडु आणि सौराष्ट्र हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात तामिळनाडुने 3 गडी राखून विजय मिळवला. सौराष्ट्रने 20 षटकात 8 गडी गमवून 183 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना तामिळनाडुची सुरुवात काही चांगली झाली नाही. पण एका बाजूने साई सुदर्शनने खिंड लढवली आणि सामना जिंकवला. खरं तर एका बाजूने धडाधड विकेट पडून साई सुदर्शने शांत डोकं ठेवत आक्रमक फटकेबाजी केली. त्याच्या या खेळीमुळे तामिळनाडुने 18.4 षटकात 7 गडी गमवून विजयी लक्ष्य गाठवलं. विजयी धावांचा पाठलाग करताना तामिळनाडुचे तीन विकेट अवघ्या 29 धावांवर पडले होते. तिन्ही विकेट एकेरी धावांवर तंबूत परतले होते. पण साई सुदर्शनने चौकार आणि षटकारांचा वर्षावर करत 55 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या या खेळीमुळे तामिळनाडुने या स्पर्धेत तिसरा विजय मिळवला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील या सामन्यात तामिळनाडुच्या विजयाचं संपूर्ण श्रेय एकट्या साई सुदर्शनला जाईल. कारण त्याच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज 30च्या पुढे धावा करू शकलं नाही. साई सुदर्शन एका बाजूला खंबीरपणे उभा राहिला आणि विजय मिळवून दिला. साई सुदर्शनने 55 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार आहेत. साई सुदर्शनने 183.64 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. साई सुदर्शनला सध्या भारतीय कसोटी संघात संधी मिळत आहे. पण त्यात काही खास करू शकलेला नाही.

साई सुदर्शन आतापर्यंत टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये डेब्यू केलं आहे. त्याने 6 कसोटी, 3 वनडे आणि 1 टी20 सामना खेळलेला आहे. टी20 फॉर्मेटमध्ये फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याला काही संधी मिळाली नाही. झिम्बाब्वेविरुद्ध 7 जुलै 2024 रोजी एकमेव टी0 सामना खेळला आहे. साई सुदर्शनचं टी20 क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. यापूर्वी दोन शतके आयपीएलमध्ये ठोकली आहेत . 66 टी20 सामन्यांमध्ये 43.21 च्या सरासरीने 2436 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 139.07 आहे.