आयपीएल स्पर्धेतून आयुष म्हात्रे आऊट होण्याचं कारण कर्णधार ऋतुराज गायकवाड? भर मैदानात काय घडलं?

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेला आयुष म्हात्रे उर्वरित स्पर्धेला मुकला आहे. खलील अहमद आणि नाथन एलिसनंतर आयुष म्हात्रे हा चेन्नई सुपर किंग्सचा तिसरा खेळाडू बाद झाला. पण आयुष म्हात्रेच्या बाबतीत कर्णधार ऋतुराज गायकवाडवर निशाणा साधला जात आहे. कसं काय ते जाणून घेऊयात..

आयपीएल स्पर्धेतून आयुष म्हात्रे आऊट होण्याचं कारण कर्णधार ऋतुराज गायकवाड? भर मैदानात काय घडलं?
आयपीएल स्पर्धेतून आयुष म्हात्रे आऊट होण्याचं कारण कर्णधार ऋतुराज गायकवाड? भर मैदानात काय घडलं?
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 21, 2026 | 7:17 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढत चाललं आहे. एकीकडे स्पर्धेतील सामन्यात जिंकण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यातच फॉर्मात असलेला खेळाडू स्पर्धेला मुकल्याने चिंतेत भर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज आयुष म्हात्रे आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित स्पर्धेला मुकला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याने स्पर्धेतून आऊट झाला आहे. आयुष म्हात्रे स्पर्धेतून बाद होण्याचं कारण खरंच दुखापत आहे की आणखी काही.. आयुष म्हात्रे स्पर्धेतून बाद झाल्याने कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि टीम फिजिओ टॉमी सिमसेक यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला जात आहे. आयुष म्हात्रेला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. पण त्याला रिटायर्ड हर्ट केलं नाही. त्याला फलंदाजी करण्यास भाग पाडल्याची चर्चा रंगली आहे आणि त्यानंतर त्याची विकेट गेली.

कर्णधार ऋतुराज गायकवाडने फलंदाजी करायला लावली?

कर्णधार ऋतुराज गायकवाडने आयपीएल स्पर्धेत आयुष जखमी असताना फलंदाजी करायला भाग पाडलं अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण तेव्हा आयुष म्हात्रेला नीट उभंही राहता येत नव्हतं. यावेळी टीम फिजिओ तिथे उपस्थित होते आणि ते देखील आयुषला पुढच्या उपचारासाठी डगआऊटमध्ये घेऊन गेले नाहीत. त्यामुळे प्रश्न उपस्थित होणं सहाजिकच आहे. या निर्णयामुळे आयुषची दुखापत आणखी वाढली का? असा प्रश्नही आहे. दुसरीकडे, म्हात्रेने स्वत: फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असंही होऊ शकतं. त्यामुळे ऋतुराज आणि फिजिओला जबाबदार धरणं चुकीचं ठरेल.

आयुष म्हात्रेमुळे चेन्नई सुपर किंग्सला धक्का

आयुष म्हात्रे स्पर्धेला मुकल्याने चेन्नई सुपर किंग्सचं मोठं नुकसान झालं आहे. कारण आयुष म्हात्रे या पर्वात चांगलं खेळत होता. त्याने सहा सामन्यात 33.50 च्या सरासरीने 201 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट हा 180च्या आसपास होता. आता स्पर्धेला मुकल्याने प्लेइंग 11 मध्ये मोठी उलथापालथ करावी लागणार आहे. बॅटिंग लाइनअपमध्ये थोडेफार बदल करावे लागणार आहेत. सध्या चेन्नई सुपर किंग्सने सहा पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 4 गुण आणि -0.780 नेट रनरेटसह आठव्या स्थानावर आहेत.

Follow Us