Sourav Ganguly Health Update | सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

Sourav Ganguly Health Update | सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 3:22 PM

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गांगुलीला बुधवारी पुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसापूर्वीच गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता. मात्र आज पुन्हा त्याला त्रास जाणवू लागला आहे. (BCCI President Sourav Ganguly again deteriorates health)

सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्रीपासून सौरव गांगुलीच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्याने डॉक्टरांशी बातचित केली. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. नुकतीच माहिती मिळाली आहे की, गांगुलीच्या कुटुंबीयांनी नुकतेच त्याला रुग्णालयात नेले आहे.

ग्रीन कॉरिडोर बनवून सौरव गांगुलीला त्याच्या बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आले. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आधी हृदयविकाराचा सौम्य झटका

यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीलाच बीसीसीआय (BCCI President) अध्यक्ष सौरव गांगुली ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल केले गेले. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कार्यभार त्याच्याच देखरेखीखाली सुरु आहे.

इतर बातम्या

सौरव गांगुलीचा हार्ट अटॅक बंगालमध्ये कुणाला राजकीय झटका देणार?

दादाला झटका, कंपनीला फटका, ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर ऑईल कंपनीची जाहिरात मागे

“दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास स्वागत”, गांगुलीसाठी भाजपची फिल्डिंग

(BCCI President Sourav Ganguly again deteriorates health)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.