AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौरव गांगुली कॅप्टन, भारतीय संघाची घोषणा, 15 सप्टेंबरला मॅच

सौरव गांगुलीने कर्णधारपद सोडून, क्रिकेट मधुन निवृत्ती स्वीकारुन आता बराच काळ लोटलाय. पण सौरव गांगुलीला पुन्हा एकदा भारताच कर्णधार बनवण्यात आलं आहे.

सौरव गांगुली कॅप्टन, भारतीय संघाची घोषणा, 15 सप्टेंबरला मॅच
BCCI President Sourav Ganguly Image Credit source: instagram
| Updated on: Aug 12, 2022 | 3:12 PM
Share

मुंबई: सौरव गांगुलीने कर्णधारपद सोडून, क्रिकेट मधुन निवृत्ती स्वीकारुन आता बराच काळ लोटलाय. पण सौरव गांगुलीला पुन्हा एकदा भारताच कर्णधार बनवण्यात आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने एका क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या मॅच मध्ये सौरव गांगुली भारतीय संघाच कर्णधारपद भुषवणार आहे. लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्यासीजन मध्ये भारताची टीम इंडिया महाराजाचा सामना रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीमशी होईल. 15 सप्टेंबरला इडन गार्डन्सवर हा सामना होणार आहे. ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने भारत आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड संघात एका सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव भारत सरकारने दिला होता. बीसीसीआय समोर हा प्रस्ताव मांडला होता.

10 देशांचे खेळाडू खेळणार

हा सामना भारताकडून इंडिया महाराजा आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड मध्ये खेळला जाणार आहे. या मॅच मध्ये 10 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या सामन्यानंतर दुसऱ्यादिवशी लीजेंड्स लीगची सुरुवात होईल. ज्यात 4 संघ खेळणार आहेत. लीगचा हा दुसरा सीजन आहे. यात 15 सामने खेळले जातील.

असा आहे भारतीय संघ

इंडिया महाराजा संघ भारताच्या माजी खेळाडूंनी मिळून बनला आहे. सौरव गांगुलीकडे या संघाचे नेतृत्व आहे. भारताचा संघ असा आहे.

सौरव गांगुली (कॅप्टन), विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, ए. बद्रीनाथ, प्रज्ञान ओझा, पार्थिव पटेल, युसूफ पठान, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक दिंडा, आरपी सिंह, अजय जडेजा, जोगिन्दर शर्मा, रीतिंदर सिंह सोढी आणि इरफान पठान

रेस्ट ऑफ द वर्ल्ड संघ

भारताचा रेस्ट ऑफ द वर्ल्ड बरोबर सामना होईल. या संघाच नेतृत्व मॉर्गनच्या हाती आहे. रेस्ट ऑफ द वर्ल्ड संघ असा आहे.

इयॉन मॉर्गन (कॅप्टन), हर्षल गिब्स, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, लेडंल सिमंस, जॅक कॅलिस, नाथन मॅकलम, जॉटी ऱ्होड्स, मशरफे मोर्तजा, असगर अफगान, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाद्जा, ब्रेट ली, केविन ओ’ब्रायन, दिनेश रामदीन, मिचेल जॉनसन.

अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!.