Cricket : 2 मालिका, 6 सामने, 31 खेळाडू, वनडे-टी 20i सीरिजसाठी टीम जाहीर
South Africa Tour Of England 2025 : दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने इंग्लंड विरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी 20I मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. उभयसंघात एकूण 2 मालिकांमध्ये 6 सामने होणार आहेत. जाणून घ्या सविस्तर.

दक्षिण आफ्रिका टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 3 सामन्यांची टी 20i मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेत सलग 2 सामने जिंकले. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिका या मालिकेतील आणि दौऱ्यातील शेवटचा सामना हा 24 ऑगस्टला खेळणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे.
2 मालिका आणि 6 सामने
उभयसंघातील दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 10 ते 14 सप्टेंबरमध्ये एकूण 3 टी 20i सामने आयोयिज करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने वनडे सीरिजसाठी 16 तर टी 20i मालिकेसाठी 15 अशा एकूण 2 मालिकांसाठी 31 खेळाडूंची निवड केली आहे. टेम्बा बावुमा वनडे सीरिजमध्ये नेतृत्व करणार आहे. तर एडेन मारक्रम याच्याकडे टी 20i संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
डेव्हिड मिलर आणि डोनोवन फरेरा या दोघांचं डिसेंबर 2024 नंतर टी 20i संघात कमबॅक झालं आहे. तसेच फिरकीपटू केशव महाराज याचंही पुनरागमन झालं आहे. तसेच ऑलराउंडर मार्को यान्सेन आणि वेगवान गोलंदाज लिझाड विलियम्स या जोडीला दुखापतीनंतर संधी देण्यात आली आहे. तसेच क्वेना मफाका याला एकदिवसीय मालिकेत वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचा कव्हर म्हणून संधी देण्यात आली आहे.
दरम्यान इंग्लंड टीमने मायदेशातील या दोन्ही मालिकांसाठी 15 ऑगस्टला संघ जाहीर केला. त्यानुसार हॅरी ब्रूक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंडने या दोन्ही मालिकांसाठी 31 खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे उभयसंघातील या दोन्ही मालिकेत 31 विरुद्ध 31 लढत पाहायला मिळणार आहे.
इंग्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेव्हिस, नांद्रे बर्गर, टोनी डी जोर्जी, केशव महाराज, क्वेना मफाका, एडन मारक्रम, वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एन्गिडी, लुआन-ड्रे प्रीटोरियस, कगिसो रबाडा, रयान रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स.
टी 20I मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मारक्रम (कॅप्टन), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, डोनोवन फरेरा, मार्को यान्सेन, केशव महाराज, क्वेना मफाका, डेविड मिलर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, लुआन-ड्रे प्रीटोरियस, कगिसो रबाडा, रयान रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाड विलियम्स.
