AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, चेन्नईच्या खेळाडूला संधी

Test Series : निवड समितीने आगामी कसोटी मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या 16 खेळाडूंमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या एकाचा समावेश आहे.

Test Cricket : 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, चेन्नईच्या खेळाडूला संधी
Chennai Super Kings Huddle TalkImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 06, 2025 | 8:11 PM
Share

आयपीएल 18 व्या मोसमानंतर आता पुढील काही आठवडे कसोटी क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 जूनपासून लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महामुकाबला खेळवण्यात येणार आहे. तर 20 जूनपासून टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी मालिका खेळणार आहे. तर दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात झिंबाब्वे विरुद्ध एकूण 2 कसोटी सामने खेळणार आहे. या 2 सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेने संघ जाहीर केला आहे.

झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 28 जून ते 10 जुलै दरम्यान कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. हे दोन्ही सामने एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने या मालिकेसाठी 16 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आयपीएलच्या 18 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या युवा आणि विस्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याची निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी एकूण 5 युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तर या दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

प्रमुख खेळाडूंना विश्रांती, युवांना संधी

टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर कगिसो रबाडा, एडन मार्करम, मार्को यान्सेन, रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी ल्हुआन-द्रे प्रिटोरियस, लेसेगो सेनोकवाने, कोडी युसुफ, डेवाल्ड ब्रेविस आणि प्रिनेलन सुब्रेन यांना संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंचं अद्याप कसोटी पदार्पण झालेलं नाही.

2 सामने आणि 16 खेळाडू

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला सामना, 28 जून ते 2 जुलै, क्विन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
  • दुसरा सामना, 6 ते 10 जुलै, क्विन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो

कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), डेव्हिड बेडिंगहॅम, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, कॉर्बिन बॉश, टोनी डी झोर्झी, झुबेर हमझा, केशव महाराज, क्वेना माफाका, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, ल्हुआन-द्रे प्रिटोरियस, लेसेगो सेनोकवाने, प्रिनेलन सुब्रेन, कायल वेरेन आणि कोडी युसुफ.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.