AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA ODI Team: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केला संघ

भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे. दुसरी वनडे 21 जानेवारी आणि तिसरी वनडे 23 जानेवारीला होणार आहे.

IND vs SA ODI Team: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केला संघ
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 8:42 PM
Share

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेने टेंबा बावुमाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. मार्को जॅनसेनला पहिल्यांदा वनडे संघात स्थान दिले आहे. (South Africa announced team For one day series against India)

वायने पर्नेल, सिसांदा मगाला आणि जुबैर हम्जा यांनी पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे. दुसरी वनडे 21 जानेवारी आणि तिसरी वनडे 23 जानेवारीला होणार आहे.

रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. क्विंटन डि कॉकचा दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघात समावेश केला आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरची डि कॉकची ही पहिली वनडे मालिका आहे. सेंच्युरियन कसोटीत भारताकडून पराभव झाल्यानंतर डि कॉकने 30 डिसेंबरला निवृत्तीची घोषणा केली.

दक्षिण आफ्रिकेची वनडे टीम टेंबा बावुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डि कॉक, जुबैन हम्जा, मार्को जॅनसेन, जानेमन मलान, सिसांदा मागाला, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी निगीडी, वायने पर्नेल, फेहलुवायो, ड्वेने प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रसी वेन डेर दुसेन आणि कायले वेरेयने

संबंधित बातम्या: 

Omicron Variant : चिंता वाढली, राज्यात ओमिक्रॉनचे 50 नवे रुग्ण, एकट्या पुण्यात 36 रुग्णांची नोंद Video : भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर! Maharashtra Corona update : राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण

(South Africa announced team For one day series against India)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.