AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heinrich Klaasen चं 37 चेंडूत वादळी शतक, रोहित शर्माच्या महारेकॉर्डची बरोबरी, असंख्य रेकॉर्ड उद्धवस्त

Heinrich Klaasen Century : आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादने मोठ्या धावसंख्येने सुरुवात केली. ईशान किशन याने त्या सामन्यात शतक ठोकले. आता हैदराबादने हंगामातील शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. हेनरिक क्लासेन याने या सामन्यात शतक झळकावत अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले.

Heinrich Klaasen चं 37 चेंडूत वादळी शतक, रोहित शर्माच्या महारेकॉर्डची बरोबरी, असंख्य रेकॉर्ड उद्धवस्त
Heinrich Klaasen IPL CenturyImage Credit source: PTI
| Updated on: May 25, 2025 | 9:56 PM
Share

सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. हेनरिक क्लासेन याने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झंझावाती शतक झळकावलं आहे.हेनरिकने हैदराबादच्या हंगामातील शेवटच्या अर्थात 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ही कामगिरी केली. हेनरिकचं हे आयपीएलमधील दुसरं शतक ठरलं आहे. हेनरिकने या वादळी शतकासह अनेक विक्रमांची बरोबरी करण्यासह अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत.

सनरायजर्स हैदराबादचा विकेटकीपर बॅट्समन हेनरिक क्लासेन याने अवघ्या 37 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. हेनरिकने या शतकी खेळीत 6 चौकार आणि 9 षटकार लगावले. हेनरिक यासह सनरायजर्स हैदराबादसाठी आयपीएल इतिहासात वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. हेनरिकने याबाबतीत ट्रेव्हिस हेड याचा रेकॉर्ड ब्रेक केला. हेडने 39 बॉलमध्ये शतक केलं होतं. हेडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएल 2024 मध्ये 15 एप्रिल रोजी ही कामगिरी केली होती.

आयपीएलमधील संयुक्तरित्या तिसरं वेगवान शतक

हेनरिक क्लासेन याने या शतकासह माजी क्रिकेटर यूसुफ पठाण याच्या विक्रमाची बरोबरी केली. हेनरिक आयपीएलमध्ये संयुक्तरित्या वेगवान शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यूसुफ पठाण याने राजस्थान रॉयल्ससाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध 13 मार्च 2010 रोजी हा कारनामा केला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला होता. वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध 28 एप्रिलला 35 बॉलमध्ये शतक केलं होतं. वैभव यासह आयपीएलमध्ये वेगवान शतक करणारा एकूण दुसरा तर पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 30 बॉलमध्ये शतक करण्याचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने पुणे वॉरियर्स इंडिया या टीम विरुद्ध हा रेकॉर्ड केला होता. गेलचा हा रेकॉर्ड गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे.

रोहितच्या विक्रमाची बरोबरी

हेनरिकने आयपीएलमधील या दुसऱ्या शतकासह रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. हेनरिकने आयपीएलमध्ये रोहितच्या 2 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली. रोहितने आयपीएलमध्ये 269 सामने खेळले आहेत. तर हेनरिकने 49 व्या सामन्यातच ही कामगिरी केलीय. हेनरिकने रोहितच्या तुलनेत 220 सामन्यांआधी ही कामगिरी करुन दाखवली.

हेनरिकची विक्रमी शतकी खेळी

हैदराबादच्या विक्रमी 278 धावा

हेनरिकने या सामन्यात 39 बॉलमध्ये 269.23 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 105 रन्स केल्या. तसेच ट्रेव्हिस हेड याने 40 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 76 रन्स केल्या. तसते हैदराबादच्या इतर फलंदाजांनीही फटेकबाजी केली. हैदराबादने यासह आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 278 धावा केल्या.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....