SRH vs RCB IPL 2022: Virat Kohli पहिल्याच बॉलवर OUT, RCB ची खराब सुरुवात

SRH vs RCB IPL 2022: आयपीएलमध्ये लीग स्टेज आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अंतिम चार संघ प्लेऑफमध्ये दाखल होण्याची शर्यत आणखी तीव्र झाली आहे.

SRH vs RCB IPL 2022: Virat Kohli पहिल्याच बॉलवर OUT, RCB ची खराब सुरुवात
IPL 2022 - RCB विराट कोहली
Image Credit source: File photo
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 08, 2022 | 3:45 PM

SRH vs RCB IPL 2022: IPL 2022 मध्ये रविवारी पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (SRH vs RCB) संघामध्ये सुरु आहे. आरसीबीचा कॅप्टन डू प्लेसिसने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण RCB ची खराब सुरुवात झाली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा सलामीवीर विराट कोहली (Virat kohli) शुन्यावर बाद झाला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज जगदीशा सुचिताच्या पहिल्याच चेंडूवर त्याने केन विलियमसनकडे सोपा झेल दिला. विराटच्या मागचं दुष्टचक्र अजूनही संपलेलं नाही. गुजरात विरुद्ध अर्धशतक त्यानंतर CSK विरुद्धची खेळी पाहून त्याला सूर गवसला आहे, असं वाटलं होतं. पण अजूनही विराटचा फॉर्मसाठी संघर्षच सुरुच आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा

आयपीएलमध्ये लीग स्टेज आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अंतिम चार संघ प्लेऑफमध्ये दाखल होण्याची शर्यत आणखी तीव्र झाली आहे. हैदराबाद आणि बँगलोरची टीमही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान आहे. बँगलोरचा संघ 11 सामन्यात 12 पॉइंटस घेऊन गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादची टीम 10 सामन्यात 10 पॉइंटससह सहाव्या स्थानावर आहे. बँगलोरने विजय मिळवला, तर त्यांचे 14 पॉइंटस होतील. प्लेऑफच्या दिशेने त्यांचं आणखी एक पाऊल पडेल. हैदराबादने सामना जिंकला तर त्यांचे 12 पॉइंटस होतील. या सीजनमध्ये दोन्ही संघात पहिला सामना झाला आहे. जी मॅच हैदराबादने जिंकली होती.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

दोन्ही टीम्सची Playing – 11

RCB ची प्लेइंग 11 – फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महीपाल लोमरॉर, दिनेश कार्तिक, शहाबाज अहमद, वानिंन्दु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड

SRH ची प्लेइंग 11 – केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जगदीशा सुचित, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, फजल फारूखी,

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें