AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी – दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी Virat kohli ला संघात स्थान मिळणार नाही? सिलेक्टर्सचं ठरलय

सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी संधी मिळू शकते.

मोठी बातमी - दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी Virat kohli ला संघात स्थान मिळणार नाही? सिलेक्टर्सचं ठरलय
IPL 2022 - RCB विराट कोहली Image Credit source: File photo
| Updated on: May 05, 2022 | 4:10 PM
Share

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) फायनलच्या पूर्वसंध्येला पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात येणार आहे. 29 मे रोजी अहमदाबादमध्ये आयपीएलची फायनल रंगणार आहे. सिलेक्टर्स आगामी दक्षिण आफ्रिका (South Africa series) आणि आयर्लंड सीरीजसाठी विराट कोहलीला (Virat kohli) विश्रांती देण्याची शक्यता आहे. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलं आहे. भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी संधी मिळू शकते. इनसाइड स्पोटर्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. विराट कोहली सारख्या काही सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयचे सिलेक्टर्स नजर ठेवून आहेत.

उमरान मलिक आणि पृथ्वी शॉ सिलेक्टर्सच्या रडारवर आहेत. दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या दोन्ही सीरीजसाठी दोघांची निवड होऊ शकते. अभिषेक शर्माच्या सुद्धा आयपीएलमधील प्रदर्शनावर नजर आहे. हार्दिक पंड्या सुद्धा टीममध्ये कमबॅक करु शकतो. पण त्याच्या फिटनेसबद्दल काही प्रश्न आहेत.

कुठल्या खेळाडूंवर सिलेक्टर्सची नजर?

उमरान मलिक सध्या भन्नाट गोलंदाजी करतोय. त्याने आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केलं आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं असून तो लवकरच टीम इंडियासाठी खेळताना दिसू शकतो, असं भाकीतही वर्तवल आहे. पृथ्वी शॉ सुद्धा भारतीय संघात कमबॅकसाठी प्रयत्न करतोय. रणजी सीजनमध्ये त्याचं प्रदर्शन फारसं चांगलं नव्हतं. पण आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी तो चांगल्या धावा करतोय. अभिषेक शर्मा सुद्धा सनरायजर्स हैदराबादचा आधारस्तंभ बनला आहे.

हार्दिकमध्ये काय वेगळे गुण दिसले?

हार्दिक पंड्या तर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फक्त तो गोलंदाजी करु शकतो का? हा प्रश्न आहे. हार्दिकचं वेगळेपण म्हणजे त्याच्यातील नेतृत्वगुण दिसून आलेत. तो गुजरात टायटन्ससाठी मैदानात उभा राहून डावाला आकार देतोय. कॅप्टन म्हणून तो अधिक जबाबदारीने खेळत असल्याचं दिसून आलय.

रोहित-विराटच्या फॉर्मचं काय?

रोहित शर्मा-विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल अनेक प्रश्न आहेत. टीम इंडियाचा उपकर्णधार के.एल.राहुल मात्र खोऱ्याने धावा करतोय. तेच रोहितचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. विराट कोहलीने मागच्या दोन सामन्यात फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. पण त्याला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया होणाऱ्या T-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी संघबांधणी महत्त्वाची आहे. त्यामुळे अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.