AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T-20 World Cup 2024 : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर हेड कोचचा राजीनामा, टीमला मोठा झटका

T-20 World Cup 2024 : वर्ल्ड कप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आफ्रिका संघाने अफगाणिस्तान संघाचा पराभव करत मोठ्या दिमाखात फायनलमध्ये जागा मिळवली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

T-20 World Cup 2024 : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर हेड कोचचा राजीनामा, टीमला मोठा झटका
| Updated on: Jun 27, 2024 | 4:40 PM
Share

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझालंडसारखे तगडे संघ बाहेर पडले. हे दोन्ही संघ वर्ल्ड कप जिंकण्याच्या शर्यतीत होते. पण क्रिकेट हा अनिश्तिततेचा खेळ आहे हे उगाच म्हटलं जात नाही. अफगाणिस्तानसारख्या संघाने सेमी फायनल गाठली आणि सर्वांना धक्का दिला. सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत त्यांचा प्रवास थांबवला.  यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसरा फायलन संघ काही तासात समजेल. मात्र इतर असे संघ ज्यांच्या पदरी निराशा पडली त्यांच्या टीम मॅनेजमेंटने मोठे निर्णय घेतलेत. एका टीमच्या मुख्य कोचने राजीनामा दिल्याने क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे.

श्रीलंका संघाचे मुख्य कोच सिल्व्हरवुड यांनी आपल्या हेड कोचपदाचा राजीनामा दिलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्या राजीनाम्यामागे काही वैयक्तिक कारणे असून कुटूंबासोबत वेळ घालवायचा असल्याचं सिल्व्हरवुड यांनी सांगितलं.  सिल्व्हरवुड यांनी श्रीलंका संघाची मुख्य प्रशिक्षक म्हणून एप्रिल 2022 मध्ये जबाबदारी घेतली होती. श्रीलंका संघाला सिल्व्हरवुड यांच्या कोटिंगमध्ये चांगलं यश मिळालं होतं. मात्र वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीमधून बाहेर पडल्याने त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.

ख्रिस सिल्व्हरवूड यांच्याआधी श्रीलंका संघाचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने यांनी श्रीलंकेच्या सल्लागार प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. पहिल्या फेरीतच श्रीलंकेचा बाहेर पडल्यानंतर जयवर्धने राजीनामा निर्णय घेतला होता. याबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी माहिती दिली होती. त्यानंतर आता हेड कोचने राजीनामा दिल्याने श्रीलंका टीमसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान,  ख्रिस सिल्व्हरवूड हे कोच असताना श्रीलंक संघाने 8 कसोटी, 26 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामने जिंकले आहेत. तर आशिया कप 2022 वरही सिल्व्हरवूड यांच्या नेतृत्त्वातच श्रीलंका संघाने नाव कोरलं होतं.

काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?.
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य.
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?.
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....