AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शेवटची ओवर… धावा 21 अन् चेंडू 6, अचानक मार्कस झिरोचा हिरो, पाहा रोमांचक खेळीची गोष्ट

पाचव्या चेंडूवर जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. यामुळे कोलकात्याला हाती असलेला सामना पुन्हा लखनौकडे गेला.

Video : शेवटची ओवर... धावा 21 अन् चेंडू 6, अचानक मार्कस झिरोचा हिरो, पाहा रोमांचक खेळीची गोष्ट
मार्कस स्टॉइनिसImage Credit source: twitter
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 19, 2022 | 7:59 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) प्रवास संपला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG) धावांनी भरलेल्या सामन्यात कोलकाता संघाला दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे कोलकाता बाहेर पडला आणि लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. या मोसमात प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तो दुसरा संघ ठरला आहे. पण, हा अंतिम निकाल आहे. काल सामन्यात काहीतरी घडले होते. त्यामुळे तणाव वाढला होता. उत्साह शिगेला पोहचला होता. आणि लखनौच्या प्लोऑफची प्रतीक्षा वाढत चालली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याच्या शेवटच्या षटकात या सर्व गोष्टी पहायला मिळाल्या. एकूण 211 धावांचा पाठलाग करताना कोलकाताला शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 21 धावा शिल्लक होत्या. लखनौने या धावसंख्येच्या बचावाची कमान आपल्या 11 कोटींचा खेळाडू असलेल्या मार्कस स्टॉइनिसकडे सोपवली. त्यानंतर त्यानं असं कही केलं की त्याच्या कामगिरीची चर्चा रंगली.

स्टॉइनिसने पहिल्या 3 चेंडूत 16 धावा दिल्या

मार्कस स्टॉइनिस कोलकाताचे शेवटचे षटक टाकायला आला. केकेआरचा फलंदाज रिंकू सिंग समोर स्ट्राइकवर होता. स्ट्राइनिसने विकेटवर गोलंदाजी सुरू केली. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. क्षेत्र बदलत त्याने दुसरा चेंडू मधल्या स्टंपवर टाकला आणि तो संथपणे टाकला. चेंडूचा वेग 127 किमी प्रतितास होता. त्यावर रिंकू सिंगने जबरदस्त षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर स्टॉइनिसला वाटले की तो यॉर्कर टाकेल पण तो चुकला आणि रिंकू सिंगला आणखी एक षटकार मारण्याची संधी मिळाली. स्टॉइनिसला आता 11 कोटी  रुपयांमध्ये राखून ठेवण्यात आले आहे. कारण, तो लखनौच्या अपक्षेपेक्षा जास्त चांगला खेळलाय. तो शून्य म्हणजेच झिरो होताना अचानक हिरो झालाय. कारण पहिल्याच तीन चेंडूत त्याने सोळा धावा झाल्यानंतर कोलकाताला विजयासाठी शेवटच्या तीन चेंडूत पाच धावा करायच्या होत्या.

शेवच्या 3 चेंडूंची थरारक गोष्ट

स्टॉइनिसच्या चौथ्या चेंडूवर रिंकू सिंगने दोन धावा घेतल्या. म्हणजेच आता कोलकाताला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूत 3 धावंची गरज होती. पण पाचव्या चेंडूवर जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. यामुळे कोलकात्याला हाती असलेला सामना पुन्हा लखनौकडे गेला. पाचव्या चेंडूवर रिंकूने शॉट खेळला पण यार्डच्या आत तो झेलला गेला. नुसती उडी मारली नाही तर अशा प्रकारे पकडला गेला की सगळेच आश्चर्यचकित झाले. एविन लुईसने रिंकूचा हा अप्रतिम झेल टीपला. रिंकू बाद झाल्यानंतर आता कोलकाताला शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या. उमेश यादव आला. मोठे फटके मारण्याची हातोटी होती. त्यामुळे फारशी आशा नव्हती. सुपर ओव्हरसाठीही शक्यता निर्माण होऊ लागली होती. पण स्टॉइनिसने अशी कोणतीही शक्यता सत्यात उतरू दिली नाही. शेवटच्या चेंडूवर उमेशला क्लीन बॉलिंग करून तो लखनौच्या विजयाचा हिरो ठरला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं