Asia Cup 2025 : निवड झाल्यानंतरही 5 खेळाडूंना एकही सामन्यात संधी मिळणार नाही, कारण काय?
Asia Cup 2025 Team India : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना अनेक दिवसांपासून होती. मात्र अखेर निवड समिताने मंगळवारी या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. तसेच 5 खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे.

यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 19 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यूएईमध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान एकूण 8 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी संघ जाहीर केला. त्यानंतर आता बीसीसीआय निवड समिताने या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. निवड समितीने या 15 सदस्यीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश केला आहे. भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या हाती आहे. तर शुबमन गिल उपकर्णधार म्हणून या स्पर्धेत जबाबदारी सांभाळणार आहे.
शुबमनचं जुलै 2024 नंतर टी 20i टीममध्ये कमबॅक झालं आहे. शुबमनच्या कमबॅकमुळे ऑलराउंडर अक्षर पटेल याच्याकडे असलेलं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. तसेच बीसीसीआयने अशा 5 खेळाडूंची निवड केली आहे ज्यांना या स्पर्धेतील एकाही सामन्यासाठी संधी मिळणार नाही.
नक्की कारण काय?
निवड समितीने मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर 5 खेळाडूंना राखीव म्हणून संधी देणयात आली आहे. या राखीव खेळाडूंमध्ये 1 ओपनर, 1 विकेटकीपर, 2 ऑलराउंडर आणि 1 फास्टर बॉलरचा समावेश आहे. राखीव खेळाडू हे मुख्य संघांचा भाग नसतात. त्यामुळे या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत नाही. अनेकदा दुखापत किंवा इतर कारणामुळे मुख्य संघातील खेळाडूंना बाहेर व्हावं लागत. अशा परिस्थितीत गरजेनुसार राखीवमधील खेळाडूंचा मुख्य संघात समावेश केला जातो. मात्र त्यानंतरही त्यांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळेलच असं नाही.
राखीव खेळाडूंचा समावेश करण्याचं कारण काय?
विदेश दौऱ्यातील मालिकेत राखीव खेळाडू निर्णायक ठरतात. विदेश दौऱ्यावर असताना खेळाडूंना दुखापत होते. अशात मायदेशातून खेळाडूंना बोलावून घेण्यात 1-2 दिवसांची प्रतिक्षा करावी लागते. मात्र राखीव खेळाडूंमुळे ही 1-2 दिवसांची प्रतिक्षा करावी लागत नाही. हा राखीव खेळाडूंचा फायदा असतो.
टीम इंडिया 3 संघांविरुद्ध भिडणार?
दरम्यान टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. आशिया कप स्पर्धेसाठी एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. भारतीय संघ अ गटात आहे. भारतासोबत या गटात यूएई, पाकिस्तान आणि ओमानचा समावेश आहे. भारतीय संघ या तिन्ही संघांविरुद्ध भिडणार आहे.
राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.
