AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी-20 वर्ल्डकपनंतर नको, आत्ताच टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला कॅप्टन करा, सुनील गावस्करांची जोरदार बॅटिंग

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. कोहलीनंतर टीम इंडियाची टी-20 क्रिकेटमधील कर्णधारपद कुणाला मिळणार याच्या चर्चा जोरात सुरु आहेत.

टी-20 वर्ल्डकपनंतर नको, आत्ताच टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला कॅप्टन करा, सुनील गावस्करांची जोरदार बॅटिंग
सुनील गावस्कर
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 5:56 PM
Share

नवी दिल्ली: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. कोहलीनंतर टीम इंडियाची टी-20 क्रिकेटमधील कर्णधारपद कुणाला मिळणार याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. कर्णधारपदाच्या स्पर्धेत रोहित शर्माचं नाव सर्वात पुढं आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही रोहित हा टी -20 मध्ये टीम इंडियाचा पुढील कर्णधार असावा, असे म्हटले आहे. गावस्कर यांनी टी-20 वर्ल्ड कपनंतर कशाला त्यापूर्वीचं रोहितला कर्णधारपदाची जबाबदारी द्यावी, असं म्हटलं आहे. दोन टी-20 वर्ल्ड कपमधील कालावधी खूप कमी आहे त्यामुळे दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धांसाठीरोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असावा, असे गावस्कर यांनी म्हटले आहे. 17 ऑक्टोबरपासून दुबईत टी-20 वर्ल्डकप सुरू होत आहे. पुढील वर्षी आणखी टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले की, मला वाटते पुढील दोन टी-20 वर्ल्ड कपसाठी रोहित कर्णधार असावा. दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धांमधील कालावधी कमी असल्यानं कर्णधार बदलू नये, असं गावस्कर यांनी स्पष्ट केलं. रोहित शर्मा हाच दोन्ही टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी माझी निवड असल्याचं सुनील गावस्कर म्हणाले.

उपकर्णधार कोण?

गावस्कर यांनी केवळ टीम इंडियाचा कर्णधार कोण असावा सांगितलं नाही तर उपकर्णधार कोण असावं हे सांगितलं आहे. के एल राहूल हा टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून पाहायला आवडेल. याशिवाय रिषभ पंतने ज्या प्रकारे दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले आहे ते कौतुकास्पद आहे. त्याला उपकर्णधार म्हणून पाहायला आवडेल, असं सुनील गावस्कर म्हणाले. आयपीएलमध्ये रिषभ पंतनं ज्या प्रकारे त्याच्यी बोलरचा वापर केला त्यावरुन तो स्मार्ट कॅप्टन्सी दाखवतोय, असं गावस्कर म्हणाले. कोणत्याही टीमला एका चतूर कॅप्टनची गरज असते, जो प्राप्त परिस्थिती चलाखीनं निर्णय घेऊ शकेल, असं गावस्कर म्हणाले. राहुल आणि पंत हे दोन खेळाडू आहेत जे टीम इंडियाचे उपकर्णधार होऊ शकतात, असं गावस्कर म्हणाले.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

इतर बातम्या:

रवी भाई आणि रोहितशी बोललो, टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडतोय, विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!

Sunil gavaskar says rohit sharma should be the captain of india for next 2 t20 world cup

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.