AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिलदार सूर्या, अजिंक्य रहाणेसाठी दाखवला मनाचा मोठेपणा, चाहत्यांकडून कौतुक

Suryakumar Yadav Ajinkya Rahane : सूर्यकुमार यादव याने अजिंक्य रहाणे याच्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवला. सूर्यकुमारच्या या कृतीसाठी क्रिकेट चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

दिलदार सूर्या, अजिंक्य रहाणेसाठी दाखवला मनाचा मोठेपणा, चाहत्यांकडून कौतुक
Suryakumar yadav smat semi final mum vs brd
| Updated on: Dec 13, 2024 | 6:49 PM
Share

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेत मुंबईच्या अजिंक्य रहाणे याचा तडाखा कायम आहे. रहाणेने उपांत्य फेरीत बडोदाविरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना 98 धावांची खेळी केली आणि मुंबईला अंतिम फेरीत पोहचवलं. रहाणेने 56 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 5 षटाकारांच्या मदतीने 98 धावा केल्या. रहाणेला त्याच्या विस्फोटक खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. या सामन्यादरम्यान मुंबईच्या सूर्यकुमार यादव याने मनाचा मोठेपणा दाखवला.सूर्याच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. सूर्याच्या कृतीसाठी स्टेडियममधील चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

नक्की काय झालं?

रहाणे 94 धावांवर खेळत होता. रहाणेसोबत सूर्यकुमार यादव खेळत होता. मुंबई विजयापासून फक्त 6 धावांनी दूर होती. बडोदाकडून अभिमन्यू सिंह बॉलिंग करत होता. अभिमन्यूने टाकलेला बॉल रहाणेला स्वीपर कव्हर दिशेने फटकावला. त्यानंतर रहाणे 1 धाव घेणार होता. मात्र सूर्याने रहाणेला रोखलं. रहाणेचं शतक व्हावं, या उद्देशाने सूर्याने त्याला 1 धाव घेण्यापासून रोखलं. सूर्याची ही कृती चाहत्यांना भावली. त्यानंतर चाहत्यांनी स्टेडियममध्ये घोषणा ज्यायला सूरुवात केली. मात्र दुर्दवाने रहाणेला शतक करता आलं नाही. रहाणेचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. रहाणे 98 धावांवर बाद झाला. विष्णू सोळंकी याने रहाणेचा कॅच घेतला. रहाणेनंतर दुसर्‍याच ओव्हरमध्ये सूर्यकुमार आऊट झाला. मात्र त्यानंतर सूर्यांश शेडगे याने सिक्स ठोकून मुंबईला विजयी केलं.

सामन्याबाबत थोडक्यात

कृणाल पंड्याच्या नेतृत्वात बडोदाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. शिवालिक शर्मा याने नॉट आऊट 36 धावा केल्या. कृणालने 24 बॉलमध्ये 30 धावा केल्या. तर शाश्वव रावतने 33 धावा केल्या. हार्दिक पंड्या 5 धावांवर आऊट झाला. मुंबईकडून सूर्याश शेडगे याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकुर, शिवम दुबे, तनुष कोटीयन आणि अर्थव अंकोलेकर या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर मुंबईने हे आव्हान 17.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं.

सूर्याचा त्याग

बडोदा प्लेइंग इलेव्हन : कृणाल पंड्या (कर्णधार), शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग राजपूत, हार्दिक पांड्या, शिवालिक शर्मा, भानू पानिया, विष्णू सोलंकी (विकेटकीपर), अतित शेठ, महेश पिठिया, लुकमान मेरीवाला आणि आकाश महाराज सिंग.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि अथर्व अंकोलेकर.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.