आयपीएल 2024 वेळापत्रकाची घोषणा होण्यापूर्वीच सूर्यकुमार यादवला मिळालं गिफ्ट, इन्स्टास्टोरीमुळे चर्चांना उधाण

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आयपीएल स्पर्धेचं 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानचं वेळापत्रक समोर आलं आहे. मुंबई इंडियन्स सध्या आलेल्या वेळापत्रकानुसार 4 सामने खेळणार आहे. त्यानंतर उर्वरित सामने जाहीर होतील.

आयपीएल 2024 वेळापत्रकाची घोषणा होण्यापूर्वीच सूर्यकुमार यादवला मिळालं गिफ्ट, इन्स्टास्टोरीमुळे चर्चांना उधाण
आयपीएल वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच सूर्यकुमारचं इन्स्टास्टोरी चर्चेत, गिफ्टबाबत म्हणाला असं काही..
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 6:28 PM

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून दहा संघ जेतेपदासाठी सज्ज झाले आहेत. 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. यात मुंबई इंडियन्स चार सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मैदानात उतरणार आहे. तसेच रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. तर सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर असून आयपीएलमध्ये पुनरागमन करेल. तत्पूर्वी सूर्यकुमार यादवची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. एका खास गिफ्टबाबत त्याने उल्लेख केला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला खास गिफ्ट काय मिळालं याची जोरदार चर्चा रंगली आहे. सूर्यकुमार यादव याने सरीन स्पोर्ट्स आणि जतीन सरीन यांना या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. या पोस्टमध्ये एक मोठा बॉक्स दिसत आहे. या बॉक्सचा फोटो काढून सूर्यकुमार यादवने नवीन वर्षाचं बेस्ट गिफ्ट अशी पोस्ट केली आहे.तसेच धडकणाऱ्या हृदयाची इमोजी टाकली आहे. आता या बॉक्समध्ये नेमकं काय आहे याची चर्चा रंगली आहे.

सूर्यकुमार यादवने या बॉक्समध्ये नेमकं काय आहे हे काही उघड केलेलं नाही. पण टॅग केलेल्या पेजवरून स्पोर्ट्स किट असावं याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवचे चाहते पुढच्या पोस्टकडे आस लावून बसले आहेत. नेमकं त्या बॉक्समध्ये काय आहे याची उत्सुकता ताणली गेली आहे. या बॉक्समध्ये स्पोर्ट्स किट असावं हाच बहुतांश क्रीडाप्रेमींचा अंदाज आहे.

Suryakumar_yadav (37)

आयपीएल वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच सूर्यकुमारचं इन्स्टास्टोरी चर्चेत, गिफ्टबाबत म्हणाला असं काही..

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्ससोबत आहेत. त्यानंतर 27 मार्चला सनराईजर्स हैदराबादशी लढत असेल. 1 एप्रिलला राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. तर 7 एप्रिल दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. आयपीएलचं मागचं वेळापत्रक पाहता प्रत्येक संघ 14 सामने खेळतो. त्यामुळे उर्वरित 10 सामन्यांचं शेड्युल लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर झाल्यानंतर समोर येतील.

मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी , शिवालिक शर्मा.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.