AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer : कॅप्टन श्रेयस अय्यर पुन्हा फायनल खेळणार, आता टीमचा विजय नक्की!

Cricket Final : श्रेयस अय्यर याने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून अफलातून कामगिरी केली आहे. श्रेयसने त्याच्या नेतृत्वाच्या जोरावर आयपीएल 2025 नंतर आता आणखी एका संघाला अंतिम फेरीत पोहचवलंय.

Shreyas Iyer : कॅप्टन श्रेयस अय्यर पुन्हा फायनल खेळणार, आता टीमचा विजय नक्की!
Shreyas IyerImage Credit source: PTI
| Updated on: Jun 11, 2025 | 2:25 PM
Share

पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर आयपीएल 2025 नंतर आता आणखी एक अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हा अंतिम सामना 12 जून रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. श्रेयस अय्यर 3 जून रोजी पंजाब किंग्सला अंतिम सामन्यात आरसीबी विरुद्ध विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्यामुळे पंजाबचं आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंग झालं. मात्र आता श्रेयस मुंबईत आपल्या टीमला चॅम्पियन करण्यासाठी कोणतीही उणीव ठेवणार नाही. त्यासाठी श्रेयसने कंबर कसली आहे. श्रेयसने त्याच्या नेतृत्वात मुंबई टी 20 लीगमध्ये मुंबई फालकन्सला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं आहे. श्रेयसच्या टीमसमोर अंतिम सामन्यात मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सचं आव्हान असणार आहे.

मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा सिद्धेश लाड (रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचा मुलगा) याच्याकडे आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना हा 10 जून रोजी पार पडला. या सामन्यात मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने ठाणे इगल स्ट्रायकर्सवर 8 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये सोबो मुंबई फालकन्सने नमो बांद्रा ब्लास्टर्सवर 5 विकेट्सने मात करत अंतिम फेरीत धडक दिली.

दुसऱ्या सेमी फायनलमध्ये काय झालं?

उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात नमो बांद्रा ब्लासटर्स टीमच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे सोबो मुंबई फालकन्सने सहज विजय मिळवला. नमो बांद्रा ब्लास्टर्सने 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 130 रन्स केल्या. ध्रुमिल मटकर याने सर्वाधिक 34 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन आकाश आनंद याने 31 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी निराशा केली. सोबो मुंबई फालकन्ससाठी आकाश पारकर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर सिद्धार्थ राऊत याने 2 विकेट्स मिळवल्या. तर यश डिचोळकर आणि विनायक भोईर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

त्यानंतर सोबो मुंबई फालकन्सने 32 चेंडूंआधी आव्हान पूर्ण करत एकतर्फी विजय साकारला. सोबो मुंबई फालकन्सने 14.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 131 रन्स केल्या. सोबो मुंबई फालकन्ससाठी इशान मुलचंदानी याने 34 बॉलमध्ये नॉट आऊट 52 रन्स केल्या. तर आकाश पारकर याने 20 चेंडूत 32 धावांचं योगदान दिलं. तर अंगकृष रघुवंशी याने 27 धावा जोडल्या. टीम सहज जिंकली. मात्र कर्णधार श्रेयस अय्यर 1 धावांवर आऊट झाला.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.