Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचताच इंग्लंडने डिवचलं, ट्विटमध्ये म्हटंल…

T 20 World Cup 2024: टीम इंडियाने कांगारुंना पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंत इंग्लंडने टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

IND vs ENG: टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचताच इंग्लंडने डिवचलं, ट्विटमध्ये म्हटंल...
team india world cup 2023
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 1:04 AM

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात विजयी घोडदौड कायम राखली आहे. टीम इंडियाने सुपर 8 मधील तिसर्‍या आणि अखेरच्या सामन्यात कांगारुंवर 24 धावांनी मात करत विजयी षटकार लगावला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र कांगारुंना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 181 धावाच करता आल्या. टीम इंडिया या विजयासह सेमी फायनलमध्ये पोहचली. आता टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधी इंग्लंडने ट्विट करत टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्लंड क्रिकेट या एक्स (आधीचं ट्विटर) अकाउंटवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये सेमी फायनल सामन्याची तारीख, वेळ आणि स्टेडियमचा उल्लेख करण्यात आलं आहे. तसेच इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. इंग्लंड सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे, असं या फोटोच्या पट्टीवर म्हटलंय. तसेच ‘गेल्या वेळेस काय झालं होतं कुणाला माहितीय?’, असा प्रश्न करत टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आमनासामना झाला होता. तेव्हा इंग्लंडने टीम इंडियाला पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याच अनुषगांने इंग्लंडने ट्विट करत भारतीय चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत सडेतोड उत्तर दिलंय. ऑस्ट्रेलियानंतर आता तुमचा हिशोब चुकता करण्याची वेळ आहे, असंही चाहत्यांनी म्हटलंय.

इंग्लंडची पोस्ट, टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.