
आयसीसीच्या बहुप्रतिक्षित नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान यूएसएने विजयी सलामी दिली आहे. यूएसएने कॅनडावर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवत इतिहास रचला. यूएसएने टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. कॅनडाने यूएसएला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. यूएसने हे आव्हान 14 चेंडूआधी 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. यूएसएने 17.4 ओव्हरमध्ये 3 बाद 197 धावा केल्या. यूएसएकडून एरान जोन्स याने नाबाद 94 धावांची खेळी केली. तर अँड्रिज गॉसने 65 धावांचं योगदान दिलं.
यजमान यूएसए क्रिकेट टीमने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. यूएसने कॅनडावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. कॅनडाने विजयासाठी दिलेलं 195 धावांचं आव्हान यूएसएने 17.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं.
दादरमधील प्राणीसंग्रहालयावर कारवाई करा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केली आहे. मनेका गांधी यांनी बीएमसी, सेंट्रल झू अॅथॉरिटी आणि वन विभागाला पत्र लिहिलं आहे.
एरन जोंस-अँड्रिज गॉस या जोडीने यूएसएकडून तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. यूएसएने 195 धावांचा पाठलाग करताना 42 धावांवर दुसरी विकेट गमावली होती. मात्र त्यानंतर एरन जोंस-अँड्रिज गॉस या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत टीमचा डाव सावरला. इतकंच नाही, तर दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. त्यामुळे आता यूएसए विजयाच्या आणखी जवळ येऊन पोहचली आहे.
एरन जोंस याने अर्धशतक ठोकलं आहे. एरनने अवघ्या 22 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. यूएसनेने 195 धावांचा पाठलाग करताना 13 ओव्हरमध्ये 2 बाद 126 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता यूएसला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये 69 धावांची गरज आहे.
नागपुरात आठवडाभरापासून उन्हाचा तडाखानंतर आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. शहराचे तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत गेलेल्या तापमानामुळे नागपूरकरांची लाही लाही झाल्यानंतर आज ढगाळ वातावरण आहे. मात्र उकाडा कायम आहे.
यूएसएने दुसरी विकेट गमावली आहे. कॅप्टन मोनाक पटेल 16 बॉलमध्ये 16 धावा करुन आऊट झाला आहे.
यूएएसए क्रिकेट टीमने कॅनडाने विजयासाठी दिलेल्या 195 धावांचा पालाग करताना निराशाजनक सुरुवात झाली आहे. यूएसएने 0 वर पहिली विकेट गमावली. स्टीव्हन टेलर झिरोवर आऊट झाला.
कॅनडाने यूएसएला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं आहे. कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. कॅनडाकडून निकोलस कर्टन आणि नवनीत धालीवाल या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. निकोलस कर्टन-नवनीत धालीवाल या जोडीने अर्धशतकी खेळी केली. नवनीत धालीवाल याने 61 आणि निकोलस कर्टन याने 51 धावांचं योगदान दिलं.
यूएसएसमोर 195 धावांचं लक्ष्य
Canada score 194/5 in their innings to set up a huge target for the co-hosts 💥
Can the USA chase it down?#USAvCAN | 📝 https://t.co/qgw3x4odue pic.twitter.com/iFoKJjQsa6
— ICC (@ICC) June 2, 2024
कॅनडाने चौथी विकेट गमावली आहे. निकोलस कर्टन आऊट झाला आहे. निकोलस कर्टनने 31 बॉलमध्ये 51 धावांची खेळी केली.
कॅनडाने तिसरी विकेट गमावली आहे. नवनीत धालीवाल 44 चेंडूंमध्ये 61 धावा करुन आऊट झाला आहे. कॉरी एंडरसनने नवनीतला जेसी सिंह याची हाती कॅच आऊट केलं.
नवनीत धालीवाल टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. नवनीतने कॅनडाकडून यूएसए विरुद्ध सलामीच्या सामन्यात 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 36 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं.
कॅनडाने दुसरी विकेट गमावली आहे. प्रगत सिंह दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. प्रगतने 7 बॉलमध्ये 5 धावा केल्या.
कॅनडाने चांगल्या सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. कॅनडाला 5.2 ओव्हरमध्ये पहिला झटका लागला आहे. एरन जॉन्सन 16 बॉलमध्ये 23 धावा करुन आऊट झाला आहे. कॅनडाचा स्कोअर 1 आऊट 43 असा झाला आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला चौकाराने सुरुवात झाली आहे. यूएसए विरुद्ध कॅनडा सलामीच्या सामन्यात आमनेसामने आहेत. यूएसएने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत कॅनडाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅनडाकडून अरुण जॉन्सन आणि नवनी धालीवाल ही सलामी जोडी बॅटिंगसाठी आली. अरुण जॉन्सनने कॅनडाचा गोलंदाज अली खान याच्या पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला.
यूएसए विरुद्ध कॅनडा या उभयसंघात टी 20 फॉर्मेटमध्ये एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. उभयसंघांचा इतिहास हा 180 वर्षांचा आहे. उभयसंघातील 8 सामन्यांपैकी सर्वाधिक सामन्यात यूएसए वरचढ राहिली आहे. यूएसएने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर कॅनडाने 2 वेळा विजय मिळवण्यात यश मिळवलं आहे.
यूएसए-कॅनडा कट्टर प्रतिस्पर्धी
1844-2024, the oldest rivalry in cricket, comes to the World Cup today!
#T20WorldCup2024 #USAvCAN #CANvUSA #T20WorldCup pic.twitter.com/b9PsYyIoT8
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) June 2, 2024
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत सिंग, निखिल दत्ता, डिलन हेलिगर, कलीम साना आणि जेरेमी गॉर्डन.
यूएसए प्लेईंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अली खान आणि सौरभ नेत्रवाळकर.
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान अमेरिका संघाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन मोनाक पटेल याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएसए संघात टीम इंडियाकडून अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेल्या मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर या मराठमोळ्या खेळाडूचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच न्यूझीलंडचा माजी फलंदाज कोरी एंडरसन यालाही प्लेईंग ईलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे.