India vs England Semi Final: उपांत्य फेरीपूर्वी या चार खेळाडूंना बेंचवर बसवण्याचा निर्णय! अभिषेक शर्माचं काय?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. भारताचा सामना इंग्लंडशी होणार असून ही लढत वाटते तितकी सोपी नाही. असं असताना या सामन्यात भारतीय संघ कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची उत्सुकता आहे.

India vs England Semi Final: उपांत्य फेरीपूर्वी या चार खेळाडूंना बेंचवर बसवण्याचा निर्णय! अभिषेक शर्माचं काय?
उपांत्य फेरीपूर्वी या चार खेळाडूंना बेंचवर बसवण्याचा निर्णय! अभिषेक शर्माचं काय?
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 05, 2026 | 4:11 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका बाजूने न्यूझीलंडने धडक मारली आहे. आता अंतिम फेरीतील दुसरा संघ भारत इंग्लंड सामन्यातून ठरणार आहे. भारत इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. इंग्लंडने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंडचं आव्हान टीम इंडियासाठी वाटतं तितकं सोपं नाही. भारत या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरेल याचीही उत्सुकता लागून आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धचं आव्हान मोडून काढण्यासाठी भारतीय संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्य टीम इंडिया कोणताही बदल करणार नाही. म्हणजेच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेला संघच यावेळी मैदानात उतरणार आहे. अभिषेक शर्मा खराब फॉर्मात असूनही त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे निश्चित आहे. तर उपांत्य फेरीचा सामना कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकु सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बेंचवर बसून पाहावं लागेल.

ओपनिंग कोण करणार?

टीम इंडिया प्लेइंग 11 मध्ये बदल करणार नाही हे तर निश्चित आहे. पण ओपनिंग जोडी बदलेल का? असा प्रश्न आहे. कारण अभिषेक शर्माची बॅट काही या स्पर्धेत चालली नाही. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकविरूद्ध 15 धावांची खेळी केली. तसेच झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर सूर गवसल्याची चर्चा झाली. पण वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा एकदा 10 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला काही लय नाही असंच क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माची कामगिरी चांगली राहिली आहे. याच स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला होता. तसेच यात मैदानावर इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं होतं. त्यामुळे आता ओपनिंगला कोण येणार? याची उत्सुकता आहे.

टीम इंडियाची प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us