AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक शर्माची एक चूक महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला नडली, फुकटच्या 16 धावा गेल्या

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढाई आहे. उपांत्य फेरी गाठायची तर हा सामना जिंकणं भाग आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने चूक केली.

अभिषेक शर्माची एक चूक महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला नडली, फुकटच्या 16 धावा गेल्या
अभिषेक शर्माची एक चूक महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला नडली, फुकटच्या 16 धावा गेल्याImage Credit source: PTI
| Updated on: Mar 01, 2026 | 8:26 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताचा महत्त्वाचा सामना वेस्ट इंडिजशी होत आहे. या सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. नशिबाने या सामन्यात नाणेफेकीवेळी साथ दिली आणि सूर्यकुमार यादवला मनासारखा निर्णय घेता आला. सूर्यकुमारने प्रथम गोलंदाजी स्वीकारली असून धावा गाठण्याचं आव्हान घेतलं आहे. आता वेस्ट इंडिजला कमीत कमी धावांवर रोखण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांपुढे होतं. प्रत्येक धाव महत्त्वाची होती. असं असताना भारताचा स्टार ओपनर अभिषेक शर्माने चूक केली. त्याच्या चुकीमुळे टीम इंडियाला 16 धावांचा फटका बसला आहे. या 16 धावा टीम इंडियाला धावांचा पाठलाग करताना महागात पडू शकतात. त्यामुळे क्रीडाप्रेमी अभिषेक शर्मावर वैतागले आहेत. एक तर त्याची बॅट या स्पर्धेत हवी तशी चालली नाही. मागच्या सामन्यात धावा केल्या. पण या सामन्यात करेल की नाही याची गॅरेंटी नाही.

पावर प्लेच्या 4 षटकात वेस्ट इंडिजचा स्कोअर फार काही चांगला नव्हता. 24 चेंडूत 28 धावा झाल्या होत्या. जसप्रीत बुमराह षटक टाकण्यासाठी आला होता आणि स्ट्राईकला शाई होप होता. या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव गेले आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. चौथ्या चेंडूचा सामना करण्यासाठी रोस्टन चेस समोर आहे. त्याने या चेंडूवर चौकार मारत आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या चेंडूवर जोरदार प्रहार केला आणि चेंडू खूप वर चढला. हा झेल अभिषेक शर्माला घेता आला नाही. त्यामुळे चेसला 14 धावांवर जीवनदान मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा त्याने पुढे घेतला आणि आणखी 16 धावा जोडल्या. रोस्टन चेस 25 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 40 धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे त्याची विकेट जसप्रीत बुमराहने काढली.

संघाचं 12वं षटक टाकण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्याकडे चेंडू सोपवला. या षटकाचील तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने शिमरॉन हेटमायरची विकेट काढली. त्यानंतर शेरफन रुदरफोर्डने एक धाव काढली आणि रोस्टन चेसला स्ट्राईक दिली. पाचव्या चेंडूचा सामना त्याने पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारला. यावेळीही चेंडू खूप वर चढला होता. पण कर्णधार सूर्यकुमार यादवने कोणतीच चूक केली नाही. अप्रतिम झेल पकडला आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार