
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला काही महिने बाकी आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांना आतापासूनच या स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेसाठी 20 पैकी प्रमुख संघ आयसीसी टी 20I रॅकिंगच्या जोरावर पात्र ठरले आहेत. तर काही संघांनी पात्रता फेरी खेळून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. टी 20I वर्ल्ड कपचा थरार फेब्रुवारी ते मार्च दरम्यान रंगणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.मात्र या स्पर्धेसाठी वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? याची क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता होती. मात्र ही उत्सूकता अवघ्या काही तासांनी संपणार आहे. टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा गतविजेता भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. स्पर्धेचं वेळापत्रक हे मंगळवारी 25 नोव्हेंबरला जाहीर केलं जाणार आहे. स्टार स्पोर्ट्सने याबाबतची माहिती दिली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. मंगळवार 24 नोव्हेंबर हा या सामन्यातील चौथा दिवस असणार आहे. दिवसाचा खेळ दुपारी 4 वाजता संपेल. त्यानंतर संध्याकाळी साडे सहा वाजता वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवरुन वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाणून घेता येईल. तर मोबाईल/लॅपटॉपवर जिओहॉटस्टारद्वारे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाणून घेता येईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात एकूण 5 शहरांमध्ये टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये सामने होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. तर श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडी इथे सामने होऊ शकतात. अशाप्रकारे एकूण 7 शहरांमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
टी 20I वर्ल्ड कप वेळापत्रक मंगळवारी जाहीर होणार
A schedule reveal like never before! 😍
Join us with @ImRo45, @Angelo69Mathews, @surya_14kumar, & @ImHarmanpreet
for the grand unveiling of the ICC #T20WorldCup 2026 fixtures! 🔥 pic.twitter.com/1uDUiGAuMV— Star Sports (@StarSportsIndia) November 24, 2025
यंदाही टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 20 संघात चुरस असणार आहे. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात असणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होऊ शकते. तर अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे.