AUS vs IND Toss: ऑस्ट्रेलियाने करो या मरो सामन्यात टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग की बॉलिंग?
Australia vs India Super 8 Toss: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा सुपर 8 फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना आहे. कांगारुंसाठी हा 'करो या मरो' असा सामना आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 51 व्या आणि सुपर 8 मधील 11 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील तिसरा आणि शेवटचा सामना आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी आहे. या सामन्याचं आयोजन हे डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया येथे करण्यात आलं आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी टॉस झाला. कॅप्टन मिचेल मार्श याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कांगारुंसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया कांगारुंवर वरचढ
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 31 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 19 सामन्यात लोळवलंय. तर कांगारुंनी 11 वेळा विजय मिळवला आहे. दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत 8 वर्षांनी आमनेसामने आहेत. याआधी दोन्ही संघांचा अखेरीस 2016 साली आमनासामना झाला होता.
ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’
दरम्यान टीम इंडियाने सुपर 8 मधील पहिले दोन्ही सामने जिंकलेत. टीम इंडियाने अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केलाय. तर ऑस्ट्रेलियाने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवलाय. तर ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला सुपर 8 मधील आव्हान कायम राखायचं असेल, तर टीम इंडिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे कांगारुंचा चांगलाच कस लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
Australia have elected to bowl against #TeamIndia.
Follow The Match ▶️ https://t.co/L78hMho6Te#T20WorldCup | #AUSvIND pic.twitter.com/d0UV4A4iRr
— BCCI (@BCCI) June 24, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
