T20 World Cup 2021: विराट कोहलीकडे ICC चॅम्पियन बनण्याची शेवटची संधी, IPL मधली चूक टाळणं गरजेचं

आयसीसी टी20 विश्वचषक 2021 ला सुरुवात होऊन काही दिवस झाले असले तरी भारतीयांसाठी स्पर्धा आजपासून (24 ऑक्टोबर) सुरु होत आहे. पहिलाच सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात असणार आहे.

T20 World Cup 2021: विराट कोहलीकडे ICC चॅम्पियन बनण्याची शेवटची संधी, IPL मधली चूक टाळणं गरजेचं
विराट कोहली

T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशा सगळ्या  टॉपच्या देशांमध्ये विजय मिळवला. कसोटी रँकिगमध्ये देशाला नंबर 1 ला पोहोचलवलं. अशा पद्धतीने  विराटने एक कर्णधार म्हणून भारतीय संघाला खूप काही दिलं. पण अजूनपर्यंत आयसीसीच्या एकाही टूर्नामेंटमध्ये त्याला कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्याला 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. मग 2019 च्या वर्ल्ड कपमच्या सेमीफायनलमध्ये पराभव आणि 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही पराभव अशारितीने अगदी महत्त्वाच्या सामन्यात महत्त्वाच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या विराटसाठी हा टी20 विश्वचषक अतिशय महत्त्वाचा आहे. दरम्यान या विश्वचषकाची सुरुवात आजपासून (24 ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs pakistan) सामन्याने होणार आहे

ही स्पर्धा विराटसाठी अत्यंत महत्त्वाची असण्यामागचं कारण म्हणजे त्याने स्पर्धा सुरु होण्याआधी यानंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा टी20 विश्वचषक त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा विश्वचषक असणार आहे. त्यामुळे विश्वचषकासह एक आयसीसीची ट्रॉफी मिळवण्याची सुवर्णसंधी विराटकडे आहे. त्यात ही स्पर्धा जिंकण्याचे शक्यताही कोहलीची अधिक आहे. त्याला काही कारणं आहेत.

भारतीय संघ उत्तम फॉर्ममध्ये

विराट कोहली हा टी20 वर्ल्ड कप 2021 जिंकण्याची संधी अधिक असण्यामागील कारण भारतीय संघाचा यंदाचा फॉर्म. सध्या भारतीय संघात संतुलित फलंदाजीसह आक्रमक फलंदाजी, भेदक गोलंदाजी असं सारकाही आहे. दोन्ही सराव सामन्यातही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही ताकदवर संघानाही भारताने नमवलं आहे. त्यामुळे यंदा स्पर्धा भारत जिंकण्याची खूप शक्यता आहे.

कशी असेल भारताती प्लेईंग XI?

सलामीवीर : संघात सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर असेल.

मधली फळी : तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि त्यानंतर अनुक्रमे सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांची नावे समाविष्ट केली जातील.

खालची फळी (अष्टपैलू-गोलंदाज) : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

विराट कोहलीला आय़पीएलमधील चूक टाळणं गरजेचं

विराट कोहलीकडे एक उत्तम आणि परफेक्ट टीम आहे. पण एक कर्णधार म्हणून त्याला काही महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं आहे. विराट कोहलीला मैदानाची अर्थात खेळपट्टीची स्थिती वातावरण पाहून फलंदाजी गोलंदाजीसह इतरही निर्णय़ योग्य घेणं गरजेचं आहे. कारण आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीने  शारजाहच्या मैदानात केकेआरविरुद्ध प्रथम फलंदाजी निवडली. ज्याचा तोटाच संघाला झाला. त्यामुळे असे चूकीचे निर्णय घेणं विराटने टाळणं गरजेचं आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

India vs Pakistan, T20 World Cup LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

(T20 World Cup is Virat kohlis best and prbably last chance to become world champion as captain)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI