IND vs PAK |टॉप-5 फॅक्टरमुळे टीम इंडियाचा पाकिस्तानवर विजय, हे आहेत विजयाचे 5 फॅक्टर

गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यात आला आहे.

IND vs PAK |टॉप-5 फॅक्टरमुळे टीम इंडियाचा पाकिस्तानवर विजय, हे आहेत विजयाचे 5 फॅक्टर
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 9:28 PM

मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या पहिल्या मॅचमध्ये रविवारी टीम इंडियाने गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यात आला. हा सामना एमसीजी स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांनी आणि जगभरातील टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी लोकांनी त्याचा आस्वाद घेतला. या सामन्या भारताने 4 गडी राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे या विजयाची 5 मुख्य गोष्टी आहेत, ती पाच मुख्य कारणं ही आहेत…

1. पांड्या पुन्हा मोठा विजेता विराटने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला तर हार्दिक पंड्याने धावा वाढवण्यावर भर दिला. भारताने 10 षटकात केवळ 45 धावा केल्या होत्या. त्यानंतर पंड्याने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांना लक्ष्य केले. हार्दिकच्या या खेळीमुळे भारताने शेवटच्या 10 षटकांत 11 च्या वर धावा गाठता आल्या.

2. पाकिस्तानविरुद्ध कोहली विराट

या सामन्यात 160 चे टार्गेट असले तरी ते काही कमी नव्हते. मात्र त्यावेळी थोडी आमची वाईटच सुरुवात झाली. 31 धावा झाल्या असतानाच चार गडी गमावले होते. त्यामुळे ही मॅच पाकिस्तानची होते का असं वाटत होते. मात्र सगळा डाव पलटला. विराट कोहलीने पुढाकार घेतला आणि क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांनी विजय लिहिला गेला. किंग कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली होती.

3. पंड्याची जबरदस्त पुनरावृत्ती केली

शमीने इफ्तिखारला फॉलो केले असले तरी हार्दिक पंड्याही मग मागे राहणार नव्हता. 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्धच्या आशिया कपमध्ये त्याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्या सामन्यात हार्दिकने 25 धावांत 3 बळी घेतले होते. यावेळी त्यानेही 30 धावामध्ये 3 बळी घेतले. पंड्याने शादाब, हैदर अली आणि मोहम्मद नवाज यांना बाद करून पाकिस्तानच्या मधल्या फळीच मोडून काढली.

4. मोहम्मद शमीचेही पुनरागमन

पहिले दोन विकेट गमावल्यानंतर शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांनी पाकिस्तानला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 50 चेंडूत 76 धावांची भागीदारीही केली. 12.1 षटकापर्यंत पाकिस्तानची धावसंख्या होती 2 गडी बाद 91 झाली होती.तर इफ्तिखारने 33 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. यामध्ये 4 षटकारांचा समावेश होता.

5. फलंदाज बाद होऊ शकले नाहीत

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण सांगताना तो म्हणाला की, सध्या येथे हिवाळा आहे आणि ओव्हरकॉस्टदेखील आहे. टीमसमोर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हेच सर्वात मोठे आव्हान होते.

पाकिस्तानचे हे दोन महत्वाचे घटक आहेत. गेल्या T20 विश्वचषकामध्ये त्याने भारतासमोर 152 धावांचे टार्गेट ठेवण्यात आले होते, आणि त्यावेळी भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभवसुद्धा झाला होता

यावेळी मात्र टीम इंडिया नव्या जोमात आणि अगदी शांतेत दाखल झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूत बाबरला गोल्डन डकवर एलबीडब्ल्यू केले. तर अर्शदीपनेही पाकिस्तानच्या दुसऱ्या आणि चौथ्या षटकातच मोहम्मद रिझवानला बाद केले.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.