USA vs SA: यूएसएने दक्षिण आफ्रिकेला 200 पार जाण्यापासून रोखलं, 195 धावांचं आव्हान

United States vs South Africa 1st Innings Highlights In Marathi: यूएसएला विजयासाठी पुन्हा एकदा 195 धावांचं आव्हान मिळालं आहे. यूएसए दक्षिण आफ्रिके विरुद्ध उलटफेर करणार का?

USA vs SA: यूएसएने दक्षिण आफ्रिकेला 200 पार जाण्यापासून रोखलं, 195 धावांचं आव्हान
Klaasen usa vs sa
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 10:13 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यूनायटेड स्टेट्सला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने जोरात सुरुवात करत यूएसएच्या गोलंदाजांवर दबाव तयार केला होता. मात्र मधल्या काही षटकांमध्ये यूएसएने झटपट विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला ब्रेक लावला. परिणामी दक्षिण आफ्रिकेला 200 पार जाता आलं नाही. आता यूएसए 195 धावांचा यशस्वी पाठलाग करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे, कारण याच टीमने आपल्या सलामीच्या सामन्यात कॅनडा विरुद्ध इतक्याच धावा चेस केल्या होत्या. तेव्हा आरोन जोन्स याने 94 धावांची नाबाद विजयी खेळी केली करत यूएसएला विजयी सुरुवात करुन दिली होती.

यूएसएने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी बोलावलं. दक्षिण आफ्रिकेने पहिली विकेट 16 धावांवर गमावली. सौरभ नेत्रवाळकर याने रिझा हेंड्रिक्स याला 11 धावांवर कोरी एंडरसन याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि कॅप्टन एडन मारक्रम या दोघांनी विस्फोटक फलंदाजी करुन खऱ्या अर्थाने चाहत्यांना टी 20 क्रिकेटची मजा घेऊ दिली. या दरम्यान दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. क्विंटन डी कॉकने या दरम्यान अर्धशतक ठोकलं. क्विंटन आणि मारक्रम या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर हरमीत सिंह याने क्विंटन डी कॉक याला 74 धावांवर आऊट केलं. त्यानंतर हरमीतने पुढील बॉलवर डेव्हिड मिलरला गोल्डन डक केलं. अशाप्रकारे यूएसएने सामन्यात कमबॅक केलं. त्यानंतर काही धावा जोडल्यानंतर मारक्रम 46 धावांवर आऊट झाला.

त्यानंतर पाचव्या विकेटसाठी ट्रिस्टन स्टब्स आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी 53 धावांची भागीदारी केली. क्लासेनने 22 बॉलमध्ये 36 तर स्टब्सने 16 बॉलमध्ये 20 रन्स केल्या. यूएसएकडून सौरभ नेत्रवाळकर आणि हरमीत सिंह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकटेकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शामसी.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग इलेव्हन: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.