AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs AFG : पाकिस्तान सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान हिशोब करणार?

Pakistan vs Afghanistan 4th Match Live Streaming : अफगाणिस्तानसमोर सलग 2 सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानची विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.

PAK vs AFG : पाकिस्तान सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान हिशोब करणार?
PAK vs AFGImage Credit source: @ACBofficials X Account
| Updated on: Sep 01, 2025 | 10:55 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेआधी यजमान यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात टी 20i ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानने या मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. पाकिस्तानने या मालिकेत अफगाणिस्तान आणि त्यानंतर यूएईला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तान आणि यूएईला आतापर्यंत विजयाची चव चाखता आलेली नाही. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध यूएई आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून कोणता संघ विजयाचं खातं उघडतो? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

त्यानंतर या मालिकेतील चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांची या मालिकेत आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. पाकिस्तानने या ट्राय सीरिजमधील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात करत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आता अफगाणिस्तानकडे आगामी सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानच्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. तर पाकिस्तान सलग तिसऱ्या आणि अफगाणिस्तान विरुद्ध दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना कधी?

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना मंगळवारी 2 सप्टेंबरला होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 8 वाजता नाणेफेक होईल.

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर लाईव्ह मॅच फॅनकोड एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

पाकिस्तानने 29 ऑगस्टला अफगाणिस्तानवर 39 धावांनी विजय मिळवला होता. पाकिस्तानने विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिल होतं. अफगाणिस्तानला प्रत्युत्तरात 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 143 धावाच करता आल्या. त्यामुळे आता अफगाणिस्तान पाकिस्तानचा हिशोब करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.