AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा, या दिग्गज खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs BAN : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिकेकडे वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली. एका दिग्गज खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा, या दिग्गज खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता
IND vs AUS : आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया-भारत मालिकेसाठी संघाची घोषणा, एका नावामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 3:20 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाने 18 सदस्यीस संघाची घोषणा केली आहे. यात एक आश्चर्याचा धक्का देणारं नाव सहभागी करण्यात आलं आहे. मार्नस लाबुशेन याला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान दिलं गेलं आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅच विनर खेळाडू फिट होत संघात परतला आहे. यात पॅट कमिन्स, स्टीव स्मिथ,मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल यांचाही सहभाग आहे. कॅमरून ग्रीनही फीट होत संघात परतला आहे. दुसरीकडे, आशिया कप स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होत आहे.  आशिया चषकानंतर टीम इंडियाची घोषणा होईल. वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून संघात फरक दिसेल असं वाटत नाही.

ट्रेव्हिस हेडला दाखवला बाहेरचा रस्ता

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा आक्रमक फलंदाज ट्रेव्हिस हेड याला वनडे मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान हाताला दुखापत झाली होती. हेडच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने वर्ल्डकपमध्ये खेळणंही कठीण आहे. त्याच्याऐवजी संघात मार्नस लाबुशेन याला संधी देण्यात आला आहे. लाबुशेन वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसेल, असंही सांगण्यात येत आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाणार आहे. इंदुरच्या होलकर मैदाात 24 सप्टेंबरला दुसरा सामना खेळला जाणार आहे. तिसरा सामना 27 सप्टेंबरला सौराष्ट्र येथे होणार आहे. दुसरीकडे, याच वर्षी मार्च महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका खेळली गेली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 2-1 पराभूत केलं होतं. आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. दुसरीकडे भारताचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, शॉन एब, नाथ एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जॉश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, ॲडम जंपा.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.