
टीम इंडियासाठी 2025 हे वर्ष अनेक अर्थाने खास ठरलं. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2013 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. सूर्यकुमार यादव याने कॅप्टन म्हणून पहिल्याच प्रयत्नात भारताला टी 20i आशिया कप ट्रॉफी मिळवून दिली. तसेच सूर्याच्या नेतृत्वात भारताने 2025 या वर्षातील शेवटची टी 20i मालिका 3-1 फरकाने जिंकली. भारताला कसोटी मालिकेत मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. कसोटी क्रिकेटमधील पराभवाचा अपवाद वगळता भारताने या वर्षात अप्रतिम कामगिरी केली. मात्र 2025 वर्षात टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी क्रिकेटला कायमचा अलविदा केला. तर काहींनी टी 20, वनडे तर कसोटी यातून निवृत्ती घेतली. ते खेळाडू कोण आहेत? जाणून घेऊयात.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी इंग्लंड दौऱ्याआधी तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराट आणि रोहित या दोघांनी वर्ल्ड कप विजयानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला होता. आता दोघेही फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात.
टीम इंडियाचा संकटमोचक असलेला चेतेश्वर पुजारा याला नाईलाजाने क्रिकेटला अलविदा करावं लागलं. पुजाराला गेल्या अनेक वर्षांपासून निवड समितीकडून संधी देण्यात आली नाही. त्यामुळे पुजाराने अखेर निवृत्ती जाहीर केली.
लेग स्पिनर अमित मिश्रा गेली अनेक वर्ष टीम इंडियातून बाहेर होता. त्यामुळे तो कधी न कधी निवृत्त होणार हे निश्चित होतं. अमितने सप्टेंबर 2025 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं.
भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋद्धीमान साहा याने 1 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. साहाने टीम इंडियासाठी स्टंपमागून अनेक सामन्यात प्रमुख भूमिका बजावली.
टी 20i 2007 आणि 2011 च्या वनडे वर्ल्ड कप विजयी संघातील फिरकीपटू पीयूष चावला यानेही 2025 मध्ये निवृत्ती जाहीर केली. वेगवान गोलंदाज मोहित शर्मा अवघ्या काही आठवड्यांआधी क्रिकेटमधून निवृत्त झाला.
वेगवान गोलंदाज वरुण एरॉन याने वर्षाच्या सुरुवातीला सर्वच प्रकारातून निवृत्ती घेतली. वरुणने त्यानंतर कॉमेंटेटर म्हणून सेंकड इनिंगला सुरुवात केली. तसेच ऑलराउंडर ऋषी धवन यानेही जानेवारी महिन्यात क्रिकेटला कायमचा रामराम केला.
भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा याने टी 20i क्रिकेमधून निवृत्ती घेतली. इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.